मुख्य बातम्या

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणार - अजित पवार

धान उत्पादक शेतकऱ्यांनात्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सरकारच्यावतीने आज दिले.

टीम अॅग्रोवन

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सरकारच्यावतीने आज दिले. 

भाजपचे आमदार सुधीर मनगुंटीवार यांच्यासह काही आमदारांनी विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील घोषणा केली. 

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र प्रत्यक्षात हे पैसे मुळ धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी बहुतांशी वेळा व्यापारी वर्गाकडेच जातात. त्यामुळे मूळ धान उत्पादक वंचित राहतात.  आपल्या शेजारील राज्यांतही धानाला बोनस दिला जातो. मात्र त्या राज्यातील धानही आपल्या राज्यात येते आणि तेपण बोनसचा फायदा घेतात, याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले. 

बाहेरच्या राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, त्यांचा फायदा व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली होती,  असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यात पैसे मिळण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे जे खरे धान उत्पादक आहेत त्यांना पैसे मिळतील. त्यांच्या नावाखाली नको ती दुकानदारी चाललेली आहे ती फार मोठी आहे याचा विचार मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT