यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणे 
मुख्य बातम्या

यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणे

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाई जाणवल्यास शेतकऱ्यांनी स्वतः जवळील बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.  राज्याचे प्रभारी गुणनियंत्रण संचालक म. स. घोलप यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीनमधील सर्व वाण सरळ वाण असल्यामुळे अशा वाणांच्या उत्पादनापासून पुढील २-३ वर्षे तेच बियाणे पुन्हा वापरता येते. ग्रामबीजोत्पादनातून तसेच पीक प्रात्यक्षिकांमधून शेतकरी गटांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनचा वापरदेखील बियाणे म्हणून करता येईल.  ‘सोयबीनचे बियाण्याचे बाह्य आवरण अतिशय नाजूक असल्यामुळे उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी या बियाण्यांची हाताळणी मात्र शेतकऱ्यांनी व्यवस्थित करावी. प्रतिहेक्टरी बियाण्याचा दर ७५ किलोवरून ५० किलोवर आणण्यासाठी टोकन पद्धत किंवा प्लँटरचा वापर करावा, असेही कृषी खात्याच्या म्हणणे आहे.  घरचे बियाणे वापरण्यापूर्वी १०-१५ किलो बियाण्याला प्रत्येकी २५० ग्रॅम रायझोबियम व पीएसबी लावून पेरणीपूर्वी तीन तास सावलीत वाळवावे. त्यानंतर पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम लावावा. त्यामुळे बुरशी येणार नाही. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच ३ ते ४ सेंटिमीटर खोलीपर्यंत सोयाबीनचे पेरणी करावी, असा सल्ला कृषी संचालक श्री. घोलप यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT