रविकांत तुपकर
रविकांत तुपकर 
मुख्य बातम्या

...अन्यथा बँक अधिकाऱ्यांना शेतकरी चोपतील ः तुपकर

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः पीककर्ज पुरवठा करण्यास ज्या बँका टाळाटाळ आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करा. अशा बँकांमध्ये प्रशासनाचे असलेले प्रत्येक विभागाचे बँक खाते काढून घेण्यात यावे. अन्यथा त्रस्त झालेले शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांना चोप देतील, असा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला. स्वाभिमानी संघटनेेने शुक्रवारी (ता. १५) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की शेतकऱ्यांच्या पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. बँकांना पीककर्ज वाटप करण्याचे शासनाचे सक्त आदेश असताना बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्हा सहकारी बँकेला राज्य बँकेकडून १५० कोटी रुपयांची गरज आहे. तथापि जिल्हा बँकेला अद्याप निधी मिळाला नाही. राष्ट्रीयीकृत बँकांची जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची नैतिक जबाबदारी असताना जिल्ह्यातील २१ राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत केवळ पाच टक्के कर्जवाटप केले आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेच्या अखत्यारीत असलेल्या गावपातळीवरील सहकारी सोसायट्या कमीत कमी शेतकऱ्यांनाच कर्जवाटप करीत आहेत. सोसायट्यासुद्धा शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठवीत आहेत. मात्र राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना बँकेच्या दारात उभे करीत नाहीत. कागदपत्रामध्ये त्रुटी दाखवून शेतकऱ्यांना हाकलून लावत आहेत. जुन्या खातेदारांनाही बँक कर्जवाटप करीत नाहीत. शेतकऱ्यांना या बँकेकडून त्या बँकेत पाठविले जाते. राष्ट्रीयीकृत बँकेचे अनेक अधिकारी मस्तवालपणे वागत आहेत. यावर्षी शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकांचे कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. कर्जसुद्धा वेळेच्या आत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेकडून तातडीने कर्जपुरवठा करण्याचे सक्त निर्देश देऊन शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. असे न झाल्यास आधीच त्रस्त झालेले शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांना बँकेत घुसून चोप दिल्याशिवाय राहणार नाहीत, असेही तुपकर म्हणाले. प्रशासकीय खाते बंद करा शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँकांमधून यवतमाळ व अकोला येथे जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय निधी काढला. असाच निर्णय बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन ज्या बँका कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत असतील अशा बँकातील प्रशासनातील महत्त्वाची बँक खाते बंद करून ते दुसऱ्या बँकेकडे वळती करून बँकाची आर्थिक कोंडी करावी, तरच हे ताळ्यावर येतील, असेही तुपकर यांनी म्हटले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT