Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Swaraj Tractor Celebrating Golden Jubilee : महिंद्रा समूहाच्या स्वराज ट्रॅक्टर्सने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, ५० व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीच्या चंडीगड येथील प्लांटमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Swaraj Tractor
Swaraj TractorAgrowon

Mumbai News :महिंद्रा समूहाच्या स्वराज ट्रॅक्टर्सने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, ५० व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीच्या चंडीगड येथील प्लांटमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Swaraj Tractor
Mini Tractor Subsidy : बचत गटांनी अनुदानावरील मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करावेत

या वेळी ‘स्वराज ८५५ एफई’ आणि ‘स्वराज ७४४ एफई’ या ट्रॅक्टरच्या लिमिटेड एडिशनचे अनावरण करण्यात आले. हे नव्याने बाजारात आणलेले ट्रॅक्टर संपूर्ण देशात दोन महिन्यांसाठी ८४३ एक्स एम, ७४२ एक्स टी, ७४४ एफई, ७४४ एक्सटी आणि ८५५ एफई या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध असतील.

सुवर्णमहोत्सवानिमित्त देशभरात ५० हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराजच्या ग्राहकांकडून त्यांच्या शेतातील माती जमा केली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून जमा केलेली माती म्हणजे स्वराजच्या खोलवर गेलेल्या मुळांचा पुरावा होय.

Swaraj Tractor
Agriculture Tractor : ट्रॅक्टरसोबत नांगराचे समायोजन करताना...

या प्रवासाच्या ध्वनिचित्रफितीसह ‘जोश का स्वर्णमहोत्सव’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी कंपनीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा व स्थित्यंतराचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. या वेळी ‘स्किलिंग ५०००’ या नव्या सीएसआर मोहिमेची घोषणा करण्यात आला.

या माध्यमातून कृषी आणि अन्य व्यवसायांतील कौशल्ये शिकवून महिला आणि दिव्यांगांना सशक्त बनविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यातून समाजात सकारात्मक बदल आणि महिलांप्रती सन्मान रुजविण्याचा मानस असल्याचे स्वराजचे सीईओ हरिश चौहान यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला स्वराजचे वितरक, भागधारक आणि अन्य क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com