Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

Kerala Bird flu : केरळमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातला आहे. येथे एका दिवसात १७ हजार बदके मारण्यात आली आहेत. तर अनेक ठिकाणी कोंबड्या दगावल्या आहेत. यावरून कर्नाटक राज्याचे पशुसंवर्धन विभाग अलर्टमोडवर आले असून जागोजागी चेकपोस्ट उघडले आहेत. 
Bird flu
Bird fluAgrowon
Published on
Updated on

Pune News : केरळमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातला असून येथे एका दिवसात १७ हजार बदके मारण्यात आली आहेत. तर अनेक ठिकाणी कोंबड्या दगावल्या आहेत. यावरून कर्नाटक राज्याचे पशुसंवर्धन विभाग अलर्टमोडवर आले आहे. जागोजागी चेकपोस्ट उघडले आहेत. यावरून पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ. अरुण कुमार शेट्टी यांनी, 'केरळमध्ये बर्ड फ्लूच्या फैलावामुळे राज्यात खबरदारी घेतली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सुळियामधील जळसूर, बंटवाळमध्ये सरदका आणि उल्लालमध्ये तळपडी येथे चेकपोस्ट सुरू केली आहेत. तसेच बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शेतमालकांना देण्यात आला आहे', असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

केरळमध्ये बर्ड फ्लूच्या फैलावामुळे कर्नाटकातही भीती पसरली आहे. मात्र, राज्य सरकार आधीच सतर्क झाले असून दक्षिण कन्नड जिल्हा प्रशासनाने केरळच्या सीमावर्ती भागात अलर्ट जारी केला आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सीमावर्ती भागात चेक पोस्ट सुरू करण्यात आली आहेत. तर केरळहून येणाऱ्या वाहनांची झडती घेतली जात आहे.

Bird flu
Bird Flu : राज्यात ‘बर्ड फ्लू’चा कोणताही धोका नाही

पुढे शेट्टी म्हणाले की, 'बर्ड फ्लूचा परिणाम शेतावर आणि मांस प्रक्रिया युनिटमध्ये काम करणाऱ्या माणसांवर होतो. दक्षिण कन्नड केरळच्या कासरगोड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कोंबड्या आणि मांसाचा पुरवठा केला जातो. तर आम्ही दररोज सहा लोड कोंबडीची वाहतूक करायचो. पण आता बर्ड फ्लूचा परिणाम आणि उष्णतेमुळे उत्पादन कमी झाले आहे. याच्या परिणामामुळे दोन लोडच जात आहेत. मंगळुरूपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या केरळच्या अलापुझा जिल्ह्यात बर्ड फ्लूचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आम्ही खबरदारी घेतली आहे. सध्या जिल्ह्यात एकही केस आढळून आलेली नाही'. 

पाळत वाढवली

'जिल्हा प्रशासनाने चेकपोस्ट सुरू केले आहे. केरळमध्ये कोंबड्या वितरतीत केल्यानंतर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ट्रकची प्राधान्याने तपासणी केली जात आहे', असे शेट्टी म्हणाले. 

Bird flu
Swine Flu : नव्या वर्षातही जिल्ह्यात स्वाइन फ्लूची धास्ती

प्रवेशाची परवानगी नाही

'पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या मजुरांनाच फक्त आत जाण्याची परवानगी असेल. शिवाय त्यांनी कोंबडी, शेतातील इतर पक्षी आणि प्राण्यांच्या संपर्कात येणार नाहीत याची खात्री करूनच काम करावे असा सल्ला शेट्टी यांनी दिला आहे. तसेच पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या मजुरांशिवाय अन्य कोणीही विनाकारण पोल्ट्री फार्मकडे जाऊ नये. कोंबड्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास जवळच्या पशुवैद्यकांना माहिती देण्याच्या आवाहन फार्म मालकांना करण्यात आले आहे'.

१७ हजार हून अधिक बदके मारली 

केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यात बर्ड फ्लूची पसरला. जिल्ह्यात तीन ठिकाणी बर्ड फ्लूची लागण झाल्याची माहिती मिळाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. दरम्यान इदथुआ पंचायतीच्या प्रभाग क्र १०, थाकाझीच्या प्रभाग क्र ४ आणि अंबालापुझा उत्तरच्या प्रभाग क्र ७ मध्ये बर्ड फ्लूची प्रकरणांची नोंद झाली. यानंतर २५ एप्रिल रोजी नमुन्यांचा तपास केल्यानंतर येथे बदक आणि कोंबड्यांमध्ये इन्फ्लूएंझा ए विषाणूचा H5N1 उपप्रकार आढळून आला. यानंतर पशुसंवर्धन विभागाने १७ हजाराहून अधिक बदकांना मारले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com