तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार गटशेतीचे कौशल्य प्रशिक्षण 
तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार गटशेतीचे कौशल्य प्रशिक्षण  
मुख्य बातम्या

तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार गटशेतीचे कौशल्य प्रशिक्षण 

टीम अॅग्रोवन 

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानातून राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी गटशेती कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर वैयक्तिक काैशल्य प्रशिक्षण देऊन ५० हजार तरुणांना कृषी उद्योजक घडविण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती अभियानाचे कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सल्लागार अमोल बिरारी यांनी दिली.  सरपंच महापरिषदेत बिरारी बोलत होते. ते म्हणाले की शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबर समविचारी शेतकऱ्यांचे गट करण्याच्या उद्देशाने ३४ जिल्ह्यांतील १८७३ महसूल मंडळात तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात पीक उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया, गटशेतीचे महत्त्व व ती कशी करावी, शेतकरी उत्पादक कंपनी, ओळख आणि व्यवस्थापन, शेतमाल मूल्यवर्धन साखळी, शेतमाल ‘ मार्केट लिंकेजेस’ याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.  वैयक्तिक कौशल्य वाढवणार  तीन दिवसांच्या या कार्यक्रमानंतर सहभागी प्रशिक्षणार्थींसोबत गटशेती सुरू करण्याबात आठ आठवड्यांचा जोड कार्यक्रम राबविला जाईल. ज्यात समन्वयक दर आठवड्याला शेतकऱ्यांसोबत गावा-गावांत जाऊन चर्चा व बैठका घेतील. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीला गटशेती प्रवर्तक म्हणून शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाईल. दोन वर्षांपर्यंत दोन लाखांचा अपघाती विमा, शासकीय योजनांचा लाभ मिळेल. बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्धता व उद्योजक घडविण्यासाठी वैयक्तिक कौशल्य विकास कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे. यात चारही कृषी विद्यापीठांंतर्गत १६७ महाविद्यालयांत सुमारे ४४ हजार २८९ विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक असे या कार्यक्रमाचे स्वरुप असेल. सहभागी युवकांना कौशल्य प्रमाणपत्र, अपघात विमा, शासकीय योजनांचा लाभ मिळेल असेही बिरारी यांनी या वेळी सांगितले.vv

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT