साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये लसणांच्या दरात घसरण
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये लसणांच्या दरात घसरण 
मुख्य बातम्या

साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये लसणांच्या दरात घसरण

वृत्तसेवा

चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे चीनमध्ये ताजा लसूण आणि साठवणीतील लसूण या दोहोंना मागणी असते. या वर्षी स्थानिक लसूण उत्पादक पट्ट्यांमध्ये अधिक उत्पादनांच्या शक्यतेमुळे साठवण करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अद्याप खरेदी सुरू केलेली नाही. त्याचा फटका लसणांच्या दराला बसला आहे. चीनमध्ये लसणाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नव्याने बाजारात आलेल्या लसणांची खरेदी करून साठवणही केली जाते. साठवण करणारे अनेक व्यापारी असून, त्यांच्याकडे मोठ्या गोदामांची सोय आहे. हे व्यापारी ज्या काळामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होते, त्या वेळी खरेदी करून साठवण करतात. मात्र, या वर्षी फारच कमी साठवणकर्त्या व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली आहे. चीनमधील घाऊक व्यापारी त्यांची मागणी कशीबशी पूर्ण करत आहेत. सध्या आवक आणि मागणी यामध्ये स्थिरता आहे. या लसणाचा दर्जा आणि किंमत याबाबतही व्यापारी अधिक दक्ष असून, साठवणीसाठी योग्य लसणांचे उत्पादन बाजारात येण्याची वाट पाहत असल्याचे सांगण्यात येते. काही लसूण उत्पादक पट्ट्यामध्ये अधिक लसूण उत्पादनाची शक्यता असून, त्यातुलनेत मागणी कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. साठवणीशिवायच्या लसणाचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये कमी राहील. लसणाला मागणीही सावकाश येत आहेत. त्यामुळे साठवणीतील लसणाला फारसा फायदा राहणार नाही. केवळ निर्यातीसाठी योग्य लसणाच्या प्रतवारीनंतर अधिक मागणी सुरू होतील. परिणामी, सध्या आवक कमी असताना दर वाढण्याची शक्यता कमी झाली आहे. या काळात खरेदीदार कमी असल्याचा हा फटका असल्याचे सांगण्यात येते. ज्या वेळी निर्यातीसाठी खरेदी सुरू होईल, त्या वेळी नैसर्गिकरीत्या बाजारामध्ये दर्जानुसार ताण वाढून, किंमतही वाढणार आहे. साठवणीबाहेरील लसणांसाठी सध्या बाजार अडचणीचा असल्याचे चित्र आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT