रावेर, यावलमध्ये राबविणार जलशक्ती अभियान
रावेर, यावलमध्ये राबविणार जलशक्ती अभियान 
मुख्य बातम्या

रावेर, यावलमध्ये राबविणार जलशक्ती अभियान

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः  रावेर व यावल तालुक्‍यांतील पाण्याची पातळी खोल गेली असून ती उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे जलशक्ती अभियान (जेएसए) राबविण्यात येत आहे. जलशक्ती अभियान हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता यात स्थानिक स्तरावरील गाव सरपंच, पंचायत स्तरावरील पदाधिकारी यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे.  राज्यातील आठ जिल्ह्यांतील २० तालुक्‍यात हे अभियान राबविले जाणार आहे. यात जळगावमधील रावेर, यावल तालुक्‍यांचा समावेश आहे. या अभियानाच्या समन्वयक तथा केंद्रीय खाण मंत्रालयाच्या संचालक फरिजा मेहबूब नाईक यांनी यासंदर्भात नुकतीच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, केंद्रीय जल व शक्ती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. एस. रोगटे, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी बी. जी. व्यवहारे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, भूजल विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक व्ही. एस. जवंजाळ, जळगाव पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता आय. एस. पढत, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, जलसंधारणाचे कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.  जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात सध्या झालेली कामे, त्यांची सद्यःस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना आदींवर भर दिला जाणार आहे. पाझर तलाव, तळे, ट्रेंच, छतावरील पाण्याचे संकलन आदी कामांवर यांत भर दिला जाणार आहे. यामुळे भविष्यात यावल व रावेर तालुक्‍यांतील पाणी समस्या दूर होणार असल्याने, अभियानामध्ये जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, माध्यम प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनाही सहभागी करून घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. वरिष्ठ शास्त्रज्ञ रोगटे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अभियानाचा उद्देश व साध्य करावयाचे उद्दीष्ट याबद्दल माहिती दिली. अभियानात स्थानिकांना सहभागी करून घेण्यासाठी मंगळवारी (ता.९) पाल येथे कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT