Only Panchnama in Jat East area; I haven't even gotten to Damadi yet 
मुख्य बातम्या

जत पूर्व भागात फक्त पंचनामे; अजून दमडीही नाही मिळाली

संख, जि. सांगली ः दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात या चालू वर्षात अवकाळी पावसाने, तर या भागातील बेळोंडगी, हळ्ळी, बालगाव, करजगी, भिवर्गी, संख, अंकलगी, सोन्याळ, उटगी, उमदी, माडग्याळ, जाडरबोबलाद, माणिकनाळ, गिरगाव, मोरबगी, आंसगी यासह अन्य गावांतील फळलागवड केलेल्या व पिकाचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.

टीम अॅग्रोवन

संख, जि. सांगली ः  दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात या चालू वर्षात अवकाळी पावसाने, तर या भागातील बेळोंडगी, हळ्ळी, बालगाव, करजगी, भिवर्गी, संख, अंकलगी, सोन्याळ, उटगी, उमदी, माडग्याळ, जाडरबोबलाद, माणिकनाळ, गिरगाव, मोरबगी, आंसगी यासह अन्य गावांतील फळलागवड केलेल्या व पिकाचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने केवळ पंचनामे केले आहेत. अजून एक दमडीही मिळाली नसून शेतकरी संतप्त झाले आहेत.

हातातोडांशी आलेला घास पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे आज पुन्हा या भागातील हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. फक्त या चालू वर्षी मध्येच अवकाळी पाऊस पडला, असे नाही. सतत तीन वर्षे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात द्राक्ष, डाळिंब, तूर, मका व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरवर्षी महसूल व कृषी खात्यामार्फत पंचनामे केले जातात. ग्रामसेवक, तलाठी, व कृषी सहायक यांच्या मदतीने पंचनामे पूर्वी सुद्धा केले आहेत. मात्र फक्त कागदावरच पंचनामे झाले. एक दमडीही शेतकऱ्यांना मिळाली नाही.

जत पूर्व भागातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष एक दमडी ही अनुदान मिळाले नाही. आता नुकसानभरपाई न मिळाल्यास जत पूर्व भागातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहे. -सोमनिंग बोरामणी, बेळोंडगीचे, ता. जत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT