माथाडी युनियनकडून ‘काम बंद’ Mathadi union calls off work
माथाडी युनियनकडून ‘काम बंद’ Mathadi union calls off work 
मुख्य बातम्या

नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’

टीम अॅग्रोवन

नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील राज्यातील विविध बाजार समित्या व रेल्वे मालधक्के, शासकीय गोदाम, विविध आस्थापनांमध्ये कामे करणाऱ्या माथाडी, मापारी व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करा.

जसे डॉक्टर्स, पोलिस, महापालिका कर्मचारी अशा या घटकांना शासनाने लागू केलेले विमा संरक्षण कवच माथाडी कामगारांना लागू करा, या मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट, जनरल कामगार युनियनच्या मुंबई व नाशिक माथाडी मंडळाने शनिवारी (ता. २४) एकदिवसीय बंद पुकारला आहे.

२२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगार नेत्यांची ऑनलाइन बैठक घेतली. यामध्ये माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील विविध मागण्या मांडल्या. या बाबत निवेदनही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले करीत अद्यापपर्यंत मागण्यांवर अधिसूचना काढली नसल्याने हा एकदिवसीय संप पुकारण्यात आला.

करण्यात आलेल्या मागण्या  कोरोनाने मृत्यू झालेल्या पन्नास माथाडी कामगारांच्या कुटुंबीयांना या संरक्षणातून ५० लाख रुपयेपर्यंत आर्थिक साह्य द्या. मागण्यांसंबंधी सुविधांची अधिसूचना शासनाने त्वरित काढावी. रेल्वे, बस सेवा व इतर व्यवस्थेने प्रवास करण्यास परवानगी द्या.

प्रतिक्रिया गेल्या वर्षभरापासून मोठे संकट देशावर आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या इतर घटकांप्रमाणे विचार व्हावा. जे जीव धोक्यात घालून काम करीत असताना मागण्या करूनही त्या विचारात घेतल्या जात नाहीत. शासन माथाडी व मापारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. -सुनील यादव, सचिव-माथाडी कामगार युनियन, नाशिक विभाग 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT