सीमेवरील कांदा निर्यातीस अखेर परवानगी
सीमेवरील कांदा निर्यातीस अखेर परवानगी 
मुख्य बातम्या

सीमेवरील कांदा निर्यातीस अखेर परवानगी

टीम अॅग्रोवन

नाशिक  : कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर या निर्णयाची तत्काळ कार्यवाही झाल्याने भारत-बांगलादेश सीमेवर पुढे जाणारा निर्यात कांदा अडकून पडला होता.  यावर तोडगा निघाल्याने काही दिवसांपासून भारत-बांगलादेशाच्या सीमेवर अडकून पडलेले कांद्याचे ट्रक शुक्रवार (ता. ४) रवाना करण्यात आले.  निर्यात बंदीचा निर्णय होण्यापूर्वी राज्यातील अनेक कांदा व्यापाऱ्यांनी निर्यातीच्या ऑर्डर घेतल्या होत्या. त्यासंबंधीच्या सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून माल पुढे पाठविण्यात आला. मात्र, कांदा निर्याती बंदीच्या तत्काळ कारवाईमुळे तो माल पुढे जाऊ देण्यास बंदी आणली होती. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा कांदा सीमेवर अडकून होता. याठिकाणी २०० हून अधिक ट्रकमध्ये माल होता.  अनेक व्यापाऱ्यांनी बाहेर देशातील आयतदारांकडून मागणी नोंदवून घेत त्या बदल्यात आगाऊ पैसे घेतले होते. त्यामुळे ऑर्डरनुसार कांदा पाठविण्यात आला होता. मात्र, कांदा निर्यात बंदीच्या तत्काळ निर्णयानंतर कांदा भारत-बांगलादेशच्या सीमेवर अडकून पडला होता. याबाबत कांदा व्यापाऱ्यांनी धसका घेतला होता. कांदा खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, कांदा काही प्रमाणात खराब झाला असे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते.  या सर्व घडामोडीनंतर कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार व भाजपचे वरिष्ठ नेते सुरेश पाटील यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यानुसार तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली. खासदार डॉ. भारती पवार यांनी गांभीर्य समजून तातडीने केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांची अडचण मांडली. त्यानुसार सर्व बाजू लक्षात घेत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत बंगाल सीमेवर उभ्या असलेल्या कांद्याचे ट्रक तत्काळ पुढे निर्यातीकरिता सोडण्याबाबत संबंधिताना आदेश दिले.  मोठे नुकसान टळले जर कांदा पुढे गेला नसता तर तो मोठ्या प्रमाणावर खराब होण्याची भीती होती. त्यात तेजीत घेतलेली ऑर्डर रद्द होऊन माल व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. मात्र, आता व्यापारी या अडचणीतून बाहेर आल्याने त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT