कापूस उत्पादकांना मिळणार नुकसान भरपाई
कापूस उत्पादकांना मिळणार नुकसान भरपाई  
मुख्य बातम्या

Cotton Crop Damage Compensation : कापूस उत्पादकांना मिळणार नुकसान भरपाई

टीम अॅग्रोवन

धुळे : जिल्ह्यातील बेटावद महसूल मंडळाला गुलाबी बोंड अळीसंबंधी नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांसाठी सर्वाधिक एक कोटी 23 लाख रुपये भरपाई मिळाली आहे. जिल्ह्यात एकूण एक कोटी 36 लाख रुपये निधी या भरपाईसाठी मिळाला असून, फक्त 13 लाख रुपये भरपाई इतर महसूल मंडळांना मिळणार आहे. निधी प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे, परंतु त्याचे वितरण अजूनही सुरू झालेले नाही. शेतकरी भरपाई किंवा मदतनिधी केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा करीत आहेत .

बेटावदला पीक कापणी प्रयोगांबाबत जागरूकता : बेटावद महसूल मंडळ हे शिंदखेडा तालुक्‍यात आहे. या तालुक्‍यात मागील पाच वर्षांत कापूस इतर पिकांचे पीक कापणी प्रयोग महसूल व इतर यंत्रणांच्या मदतीने झाले, त्यात उत्पादनाबाबतची वास्तविकता दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला.

विशेषतः पढावद (जि. धुळे) येथील जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनीने या पीक कापणी प्रयोगांमध्ये वास्तव कसे समाविष्ट होईल, यासाठी प्रशासनाकडे रेटा लावला. परिणामी, मागील पाच वर्षांचे सरासरी उत्पादन, उत्पादकता यासंबंधी या महसूल मंडळात सरासरी दिसत आहे. यामुळे विमा वितरण करताना सरासरी उत्पादन व उत्पादकता याची माहिती महसूल विभागाने दिली, त्यानुसार विम्याची रक्कमही या मंडळास मिळाली आहे.

कमी उंबरठा उत्पादन किंवा अतिशय कमी उत्पादन दाखविण्याचा अट्टाहास या भागातील शेतकऱ्यांनी केलाच नाही. त्यामुळे आता भरपाईची मोठी रक्कम या मंडळाला मिळणार असल्याचा दावा जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केला.

बोंड अळीच्या भरपाईबाबतची मंडळनिहाय जाहीर रक्कम :

(रक्कम किंवा निधी रुपयात)

Cotton Market News

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT