नुकसान
नुकसान  
मुख्य बातम्या

अतिवृष्टीमुळे मदतीसाठी केंद्राचे निकषांवर बोट

टीम अॅग्रोवन

सोलापूर : केंद्र सरकारच्या एनडीआरएफमधून मिळणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये अवेळी पाऊस अन्‌ ढगफुटी बसत नसल्याची आठवण केंद्र सरकारने राज्य सरकारला करून दिली आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील सुमारे २७ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सत्तास्थापनेच्या संघर्षात आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत मदत मिळणार, याबाबत अधिकारीही काहीच स्पष्टपणे सांगत नसल्याचे चित्र आहे.  अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल ५४ लाख हेक्‍टरवरील शेतीपिकांचे सुमारे १४ हजार ७०० कोटींचे नुकसान झाल्याचा नजर अंदाज अहवाल कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आला.  दरम्यान सोलापूर, नाशिक, परभणी, नांदेड, जालना, बीड, लातूर, अकोला, औरंगाबाद, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या १७ जिल्ह्यांमध्ये द्राक्ष, टोमॅटो, मिरची, भात, मका, कापूस, बाजरी, फ्लावर, कांदे, सोयाबीन, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  संबंधित जिल्हाधिकारी व कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, अद्याप पाऊस सुरूच असल्याने पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. तत्पूर्वी, विधानसभा निवडणूक होऊनही सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही. त्यातच पुन्हा केंद्र सरकारने निकषांवर बोट ठेवत मदतीसाठी हात वर केल्याने राज्य सरकारच्या मदतीची नुकसानग्रस्त बळिराजाला प्रतीक्षा लागली आहे. सर्व काही अतिवृष्टीमुळेच... राज्यातील १७ जिल्ह्यांमधील २७.६३ लाख शेतकरी हवालदिल   ५४ लाख हेक्‍टरवरील शेतीपिकांचे १७ हजार ७०० कोटींचे नुकसान   नव्याने लागवड केलेला कांदा पडला पिवळा : टोमॅटो, कापूस, बाजरी, मका जमीनदोस्त   पंचनाम्यांचे आदेश मात्र मनुष्यबळ पडतेय कमीच : पाऊस सुरू असल्याने अहवाल लांबणीवर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT