कांदा साठवणुकीच्या संदर्भात प्रशासन सतर्क
कांदा साठवणुकीच्या संदर्भात प्रशासन सतर्क 
मुख्य बातम्या

कांदा साठवणुकीच्या संदर्भात प्रशासन सतर्क

टीम अॅग्रोवन

नाशिक : कांदा दर नियंत्रणासाठी निर्यातबंदी नंतर लगेच साठवणुकीवर मर्यादा आणून व्यवहारांवर निर्बंध केंद्र सरकारने लागू केले. यांनतर पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झाले असून, दैनंदिन खरेदी-विक्री, मालाची निकासी व साठवणूक यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप कांद्याचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.  दरस्थिती लक्षात घेऊन साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या आहेत. कांद्याचे व्यवहार बाजार समितीत पार पडल्यांनातर दररोज होणारी कांदा आवक, निर्गती व शिल्लक साठ्याची तपासणी दररोज संबंधित बाजार समित्यांचे सचिव व बाजार समितीचे प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येत आहे की नाही याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून लक्ष देण्यात येत आहे. दैनंदिन संपूर्ण आढावा विहित नमुन्यात प्राप्त करून तो जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येत आहे.  ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील कांद्याचे प्रमुख आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने तडाखा दिला. खरिपातील उशिराचा कांदा वाया गेला असतानाच मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका उन्हाळी कांद्यालाही बसणार आहे. पुढील वर्षी उन्हाळ कांदा उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. परिणामी उपलब्ध कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याची धडपड सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे कांद्याची साठेबाजी होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. कांद्याची साठेबाजी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांना त्यांच्याकडे दररोज येणाऱ्या कांद्याची, विक्री झालेल्या तसेच उपलब्ध साठ्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे. तसेच साठेबाजी रोखण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर  घाऊक व्यापाऱ्याला ५०० क्विंटल व किरकोळ व्यापाऱ्याला १०० क्विंटलपर्यंत कांदा साठवणूक करण्याची परवानगी आहे. कळवण, सटाणा, येवला तालुक्यातील बाजार समित्यांमधील काही व्यापाऱ्यांकडे पथकांमार्फत तपासणी करण्यात आली. मात्र कामकाज सुरळीत असून वॉच कायम असणार आहे. याबाबत दैनंदिन कामकाजाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दररोज पाठविण्यात येत असल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT