‘महाबीज’ने पुरेसा बियाणे पुरवठा करावा ः नवाब मलिक 
मुख्य बातम्या

‘महाबीज’ने पुरेसा बियाणे पुरवठा करावा ः नवाब मलिक

जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रातील संभाव्य वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाबीज’ने बियाणे उत्पादक कंपन्यांकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

टीम अॅग्रोवन

परभणी ः खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रातील संभाव्य वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाबीज’ने बियाणे उत्पादक कंपन्यांकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये शनिवारी (ता. १) आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीमध्ये मलिक बोलत होते. या वेळी आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मेघना साकोरे -बोर्डीकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रीतम जंगम, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक सुनील हट्टेटकर, ‘महाबीज’चे अधिकारी आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मलिक पुढे म्हणाले, की गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे निकृष्ट बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. संबंधित बियाणे उत्पादन कंपन्यांकडून तक्रार केलेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई देणे आवश्यक होते. परंतु अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. येत्या खरिपासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते आदी निविष्ठा पुरेशा प्रमाणात तसेच वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात. मध्य प्रदेशातून सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत असतील तर महाबीजने सोयाबीनच्या बियाण्याची गरज लक्षात घेऊन अन्य राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांकडे बियाणे उपलब्धतेसाठी पाठपुरावा करावा. बॅंकांनी पीककर्ज वाटप सुरू करावे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT