जळगाव : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू झालेली आहे. आयोगाने जिल्हा प्रशासनाला ५ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाने गट-गणांच्या प्रारूप रचनेसह जिल्हाधिकाऱ्यांना ९ फेब्रुवारी रोजी आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत पत्र दिले आहे.
राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत केलेल्या नवीन कायद्यानंतर आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. २ फेब्रुवारी रोजी आदेश काढून ५ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप रचना सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने काढले होते. दरम्यान, ४ फेब्रुवारी राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अ.गो. जाधव यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे आदेश काढले आहेत.
यात जळगाव जिल्ह्यातील गट-गणांच्या प्रारूप रचनेच्या यादी, नकाशांसह जिल्हाधिकारी, संबंधित पंचायत समिती क्षेत्रातील तहसीलदारांना आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने केलेल्या नियोजनानुसार जळगाव जिल्ह्याची प्रारून गट-गण रचना येत्या ९ फेब्रुवारी रोजी आयोगाकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.
राजकीय पक्ष सतर्क,इच्छुकांची चाचपणी निवडणूक आयोगाकडून प्रारूप रचनेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्हा परिषद , पंचायत समितीसाठी राजकीय पक्षाकडून चाचपणी सुरू झाली आहे. तसेच ज्या त्या गटातील इच्छुक असलेल्या उमेदवारांनी देखील गट व गणातील संभाव्य गावांमध्ये संपर्क वाढविला आहे.निवडणूक आयोगाकडे गट व गण रचना गेल्यानंतर हरकती,त्यांचा निपटारा,गट व गणांची आरक्षण जाहीर होईल त्यासाठी ते इच्छुक नजर ठेवून आहे.
असा आहे कार्यक्रम मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया व नागपूर वगळून राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका - प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत.
जिल्हानिहाय प्रारूप रचना सादर होणार
८ फेब्रुवारी...रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग ९ फेब्रुवारी...नाशिक, जळगाव, अहमदनगर १० फेब्रुवारी...पुणे, सातारा, ११ फेब्रुवारी...सांगली, सोलापूर, कोल्हापूर १२ फेब्रुवारी...औरंगाबाद,जालना, परभणी हिंगोली,बीड,नांदेड,उस्मानाबाद, लातूर १३ फेब्रुवारी...अमरावती, बुलढाणा, यवतमाळ १४ फेब्रुवारी...चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.