योगेंद्र यादव
योगेंद्र यादव 
मुख्य बातम्या

मोदी सरकार शेतकरीविरोधी: योगेंद्र यादव

टीम अॅग्रोवन

पुणे ः ''मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, आता सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कसलीच वाढ झाली नसून, उत्पन्न घटले आहे. यामुळे हे सरकार आणि पंतप्रधान मोदी आतापर्यंतचे सर्वाधिक शेतकरीविरोधी सरकार आणि पंतप्रधान आहेत.'' अशी टीका स्वराज अभियान पक्षाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केली.  एकरकमी एफआरपीबरोबरच विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चात योगेंद्र यादव सहभागी झाले होते. महाराष्ट्रात शेतकरी मोर्चात यादव हे पहिल्यांदाच सहभागी झाले होते.  या वेळी यादव म्हणाले, की मोदींनी  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांचे नावही काढले नाही. आता मात्र शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातील. मात्र, त्याचा उपयोग होणार नाही. कारण या सरकारला खाली खेचायचा निर्णय शेतकऱ्यांनी यापूर्वीच घेतल्याचे मध्य प्रदेश, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील निकालातून स्पष्ट झाले. त्यामुळे सरकारने सवलती दिल्या, तरी शेतकरी सरकारच्या विरोधात जाणार हे नक्की.  दरम्यान ऊसदर आणि थकीत ऊसबिलाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात उसाची थकबाकी पाच हजार कोटी, तर उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडे सहा हजार कोटी रुपये थकीत असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर कायमस्वरूपी कर्जमुक्ती हवी आहे. शेतकऱ्याला कर्ज होणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यावी. सहा वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न सरकारने दाखविले. मात्र, पहिल्या तीन वर्षांत किती उत्पन्न वाढले, याची आकडेवारी जाहीर करावी. पहिल्या तीन वर्षांत पाच टक्के उत्पन्नदेखील सरकार वाढवू शकले नाही.

यादव यांची ओळख योगेंद्र यादव हे सामाजिक आणि राजकीय विश्‍लेषक आहेत. यादव आप पक्षाची स्थापना झाल्यानंतर राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये त्यांनी आप पक्षातून बाहेर पडल्यानंतर प्रशांत भूषण यांच्यासोबत स्वराज्य अभियान पक्षाची स्थापना केली. स्वराज्य अभियान पक्ष देशातील शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT