यंदा गुऱ्हाळ हंगाम लवकरच आटोपणार 
मुख्य बातम्या

यंदा गुऱ्हाळ हंगाम लवकरच आटोपणार

सुरेश पाटील 

सोनाळी  : यंदा अतिपावसाच्या फटक्‍यामुळे ऊस पिकात घट झाली आहे. विविध अडचणींमुळे जिल्ह्यात ७० ते ७५ टक्के गुऱ्हाळघरे बंद आहेत. ऊस उत्पादनातील घट, व्यापारांची मनमानी, मजुरांची कमतरता, विविध रोगांचा प्रादुर्भाव, गूळ तयार करण्यासाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या साहित्यांत्या किमतीत झालेली वाढ, बॅंकांचा कर्जासाठी तगादा आदी कारणांमुळे गुऱ्हाळ मालक मेटाकुटीला आले आहेत. विविध संघटना व कारखानदांराकडून ऊसदराचा तिढा सुटल्याने गुऱ्हाळ हंगाम लवकर संपणार आहे. अनेक रोगांमुळे ऊस उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी ऊस क्षेत्रात वाढ झाली होती पण यंदा अतिपाऊस  रोगांमुळे उसाची उंची वाढली नाही. त्यामुळे उसाचे वजन घटले आहे.   गुऱ्हाळ मालकांनी हंगामासाठी ७ ते  ८ लाखांची गुंतवणूक केली आहे. सध्या गुऱ्हाळघरावर काम करणाऱ्या मजुराला दिवसाला २२५ ते २५० रुपये मजुरीबरोबरच दोन किलो गुळ द्यावा लागतो. तर काही गुऱ्हाळघरावर बिहारी मजुराला दिवसाला ३०० रुपये मजुरी व दोन किलो गूळ द्यावा लागतो. गुऱ्हाळ मालकाचा विचार केल्यास एका आदणाला २०००ते २२०० रुपये खर्च येतो. गुऱ्हाळ घरावर काम करण्यासाठी मजुरांची कमतरता आहे. काही ठिकाणी महिलांही काम करत आहेत.

वीज प्रश्न गंभीर हंगामात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गुऱ्हाळ मालक अडचणीत आले आहेत. मुळातच मनुष्यबळाची कमतरता असताना वीज नसल्याने. मजुरांना तासन्‌तास बसून रहावे लागते. डिझेल्या वाढत्या किमतीमुळे डिझेल इंजिनवर गुहाळ चालवणे ही शक्‍य होत नाही.  

शेतीला लागणारी खते  बि-बियाणे, नांगरट, पाणी, मशागत, मनुब्यबळ आदी खर्च शेतकऱ्यांना जास्त असल्याने गुळाला ६००० रुपयांपर्यंत दर मिळाला तरच शेतकऱ्यांना ऊस शेती करणे परवडेल.   - कुंडलिक पाटील, शेतकरी, हसूर दुमाला

३४०० ते ४२०० रुपये दर गुऱ्हाळ मालकांना न परवडणारा आहे. वीज, मजुरांचा पगार व इतर खर्च वजा जाता गुन्हाळमालकांना हा दर तोट्याचा आहे. त्यामुळे सरासरी ५५०० ते ६०००   रुपये दर दिला तरच गुऱ्हाळघरे सुरू राहतील, अन्यथा गुन्हाळघरे बंद करावी लागतील.  - दिगंबर अतिग्रे, गुऱ्हाळ मालक, हिरवडे खा.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT