This year the `bail pola` will be celebrated with enthusiasm 
मुख्य बातम्या

यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार

रोपळे बुद्रूक : समाधानकारक पाऊस पडल्याच्या आनंदात शेतकरी बैलपोळ्याचे साहित्य खरेदी करू लागले आहेत . त्यामुळे कोरोनाचे संकट कायम असल तरी जिल्हयात यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र आहे.

टीम अॅग्रोवन

रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर  : रोपळे ( ता. पंढरपूर ) येथे बैल पोळ्याच्या साहित्याची थुकाने थाटली आहेत. बैल पोळ्याचा सण अजून दहा दिवस लांब आहे . तरीही या भागात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याच्या आनंदात शेतकरी बैलपोळ्याचे साहित्य खरेदी करू लागले आहेत . त्यामुळे कोरोनाचे संकट कायम असल तरी जिल्हयात यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र आहे. 

बैल पोळा साहित्याची दुकाने यंदा दहा -बारा दिवस अगोदरच उभारली गेली आहेत. कोरोनाचे संकट सर्व जगावर असले तरी शेतकरी मात्र आपल्या सर्जा -राजाला सजवण्याची हौस पुरी करण्यात जराही काटकसर करताना दिसले नाहीत . अजूनही गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या दारातील बैलजोडीचा चांगला सांभाळ केला आहे. किंबहुना दावणीला बैलजोडी नसेल तर शेतकरी म्हणून घेणे येथील काही शेतकऱ्यांना पसंत नाही. त्यामुळे या गावात आजही बैलजोडीचा  चांगल्या  पद्धतीने  सांभाळ केला जात आहे.

दरवर्षी इथे बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते . तब्बल दहा वर्षानंतर यंदा प्रथमच वेळेत व चांगला पाऊस पडत गेला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात विविध पिकांची लागवड केली आहे. पावसामुळे शेत -शिवार हिरवेगार झाले. त्यामुळे शेतकरी यंदा बैल पोळ्याचा सण आनंदाने साजरा करण्याच्या तयारीला लागला आहे. 

कोरोनाचं संकट असल तरी यंदा चांगला पाऊस पडलाय. मग पोळ्याला बैलजोडीची हौस करायला आम्ही मागं- पुढं बघणार न्हाय.  - कैलास व्यवहारे , शेतकरी , रोपळे बुद्रूक , ता . पंढरपूर , जि . सोलापूर

आजूबाजूच्या गावातूनही शेतकरी इथे बैल पोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी येऊ लागले आहेत.  - निहाल शेख , बैल पोळा साहित्य विक्रेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT