In Yavatmal district, four lakh farmers took out crop insurance
In Yavatmal district, four lakh farmers took out crop insurance 
मुख्य बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, सरकारने मुदतवाढ न दिल्याने अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. त्यानंतरही गेल्या वर्षीच्या चार लाख विमा धारकांच्या तुलनेत यावर्षी तीन लाख ८८ हजार शेतकऱ्यांना विमा उतरविता आला.

यंदा लॉकडाऊन तसेच इतर अडचणी असताना पीक विमा काढणाऱ्या शेतकरी संख्येत वाढ झाली आहे. बिगर कर्जदार तीन लाख ८८ हजार ३७२ शेतकऱ्यांनी विमा उतरविला गेल्यावर्षी अनेकांना प्रीमियम भरल्यानंतर नुकसानापोटी परतावा मिळाला नाही, असे आरोप  झाले. त्यामुळे यावर्षी पिक विमा अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.

नैसर्गिक आपत्तीत पुरेसा पाऊस न पडणे गारपीट पूर वादळ दुष्काळ यासारख्या गोष्टींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा परतावा दिला जातो. जिल्ह्यात तीन वर्षांसाठी इफ्को-टोकीयो कंपनी निश्चित करण्यात आली आहे. बँकांसह सेतू केंद्राच्या माध्यमातून विमा भरून घेण्याचे काम झाले.

जिल्ह्यात तीन लाख ८८ हजार ३८२ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा बँक उतरणार आहे. त्यामुळे विमाधारकांचा आकडा वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी बँकांना १५ दिवसांची सवलत आहे. १५ ऑगस्ट पर्यंत बँकांना डाटा एन्ट्री करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा आकडा दीड लाखाने वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. परिणामी यंदा शेतकऱ्यांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

तीन लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित यंदा शेतकऱ्यांचा कल पीक विमा काढण्याकडे जास्त दिसून आला. परिणामी अनेक अडचणींचा सामना करुन शेतकऱ्यांनी विमा उतरविला. आतापर्यंत २ लाख ७० हजार ५५२ हेक्टरवरील पीक शेतकऱ्यांनी विमा काढून संरक्षित केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT