महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः वायचळ  
मुख्य बातम्या

महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः वायचळ

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचे उत्तम साधन असून,  ग्रामीण भागातील महिलांनी जास्तीत-जास्त बचतगट स्थापन करून आर्थिक प्रगती साधावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सोमवारी (ता. १७) येथे केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या रुक्‍मिणी जत्रा या प्रदर्शनाचे उद्‌घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे, सभापती स्वाती शटगार, संगिता धांडोरे, मोहोळ पंचायत समितीच्या सभापती श्रीमती पोतदार, जिल्हा परिषदेचे सदस्य वसंत देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे, विदर्भ कोकण बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक सुहास काकडे, बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक सुनिता भोसले आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ म्हणाले, महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ व उत्पादनांच्या विक्री व वृद्धीसाठी बचत गटांनी उत्पादनांची विक्री करण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यात एकूण १९ हजार बचतगट असून, या गटांना व्यवसाय करण्यासाठी बॅंकांनी पतपुरवठा केल्याने बचत गटांचे सदस्य आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.  या प्रदर्शनात सोलापूरसह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांतील महिलांनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक अभिराम सराफ यांनी केले. या वेळी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर येथील महिला बचत गटांचे सदस्य उपस्थित होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती

Rain Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता

MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही

Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

NDRF Assistance Norms: एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत केंद्र सरकारकडून वाढ; आपत्तीग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT