Will the Bullfighting Festival be celebrated again this year? 
मुख्य बातम्या

यंदाही बैलपोळा सण साजरा होणार की नाही?

गेल्यावर्षात कोरोना निर्बंधामुळे पोळा सणावर विरजण पडले होते. सध्याही सण, उत्सवांना परवानग्या नसल्याने यंदासुद्धा पोळा सण सार्वजनिकरित्या साजरा करता येईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्यावर्षात कोरोना निर्बंधामुळे पोळा सणावर विरजण पडले होते. सध्याही सण, उत्सवांना परवानग्या नसल्याने यंदासुद्धा पोळा सण सार्वजनिकरित्या साजरा करता येईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.

वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलांचा पोळ्याच्या दिवशी शेतकरी सन्मान करीत असतो. यंदा हा सण सोमवार (ता. सहा सप्टेंबर)ला आहे. ग्रामीण भागातील आठवडी बाजारांत बैलपोळ्यानिमित्त लागणारे सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. 

पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांना आवतन (निमंत्रण) देत असतात. खांदे मळणी केली जाते. पोळ्याच्या दिवशी बैलांना स्नान घालून रंगरंगोटी केली जाते. झुला चढविल्या जातात. गावच्या वेशीवर गावातील सर्व बैल एकत्र होऊन पोळा भरवण्याची परंपरा आजही टिकून आहे. परवानगी मिळाली तर सार्वजनिक पोळ्यात सहभाग अन्यथा घरीच बैलांची पूजा, ओवाळणीची तयारी सुरू झाली आहे.

बैलपोळ्याचा सण सार्वजनिक पद्धतीने साजरा करायचा किंवा नाही याबाबत ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांना अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. - कैलास नागरे, शेतकरी, शिवणी आरमाळ, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

SCROLL FOR NEXT