ताकारी, म्हैसाळ योजना कधी सुरू करणार?
ताकारी, म्हैसाळ योजना कधी सुरू करणार? 
मुख्य बातम्या

ताकारी, म्हैसाळ योजना कधी सुरू करणार?

टीम अॅग्रोवन

सांगली : दुष्काळी पट्ट्यातील अद्यापही पाणीटंचाई कमी झालेली नाही. द्राक्ष आणि डाळिंब बागांना पाणी मिळत नाही. ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे आवर्तन अद्यापही सुरू केलेले नाही. या योजना सुरू झाल्या, तर डाळिंब आणि द्राक्ष बागांना टॅंकरने पाणी देऊन जगवता येतील. त्यामुळे जिल्ह्यातील ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना कधी सुरू करणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. 

दुष्काळीपट्ट्यात अद्यापही परतीचा पाऊस झाला नाही. जो पाऊस झाला, तो हलका व मध्यम स्वरूपाचा होता. पण, या पावसाचा काहीच उपयोग शेतीला होणार नाही. त्यामुळे पाणीटंचाई कमी झालेली नाही. वास्तविक पाहता म्हैसाळ उपसा सिंचन योजना सप्टेंबरच्या पंधरा तारखेनंतर सुरू करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला होता. मात्र, अद्यापही ही योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाने कोणत्याही हालचाली सुरू केलेल्या दिसत नाहीत. जत तालुक्यातील पश्चिम भागासह अन्य भागांत पाणीटंचाई आहे. 

ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील कडेगाव, पलूस, वाळवा तालुक्यांत दमदार पाऊस झाला, त्यामुळे ही योजना सुरू केली जाणार नसल्याचे दिसते आहे. मात्र, तासगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात पाऊस झाला. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पंधरा ते वीस दिवसांनंतर या भागांतील द्राक्ष शेतीला पाण्याची गरज भासेल. त्यामुळे ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या उपसा सिंचन योजनांची वीजबिलाची थकबाकी ४२ कोटींच्या घरात आहे. ती भरली तरच, योजना सुरू केली जाणार आहे. मात्र, टेंभू उपसा सिंचन योजनेची वीजबिलाची थकबाकी भरून योजनेचे आवर्तन सुरू केले आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभक्षेत्रातील पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. 

थकबाकीमुळे आवर्तन रखडणार

मात्र, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे थकलेले वीजबिल अद्यापही पाटबंधारे विभागाने भरलेले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने थकीत वीज बिल भरले, तरच ही योजना सुरू होईल. परंतु, अद्यापही वीजबिल भरण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने आवर्तन वेळेत सुरू होणार नसल्याचे दिसते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT