Wheat sowing completed in Pune division
Wheat sowing completed in Pune division 
मुख्य बातम्या

पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्या

टीम अॅग्रोवन

पुणे : गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या ही लांबल्या होत्या. मात्र काही दिवसांपासून वातावरणात वेगाने बदल होत असल्याने त्यांचा परिणाम पेरणीवर होत आहे. काही भागांत गव्हाच्या पेरण्या उरकल्या असून, अनेक ठिकाणी गहू पिके वाढीच्या अवस्थेत आहे. आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ३३ हजार ७० हेक्टरपैकी एक लाख ६१ हजार ४३३ हेक्टर म्हणजेच १२१ टक्के पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षीही याच काळात गव्हाच्या तब्बल एक लाख ६९ हजार ९९५ हेक्टर म्हणजेच १२८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या आठ दिवसांत कृषी विभागाने पेरणीचा अंतिम आढावा घेतल्यानंतर या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा होता. गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र, यंदा उशिराने झालेल्या पावसामुळे पेरण्या ही लांबल्या होत्या. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे. 

पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर ही तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखली जात असून विभागात अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक गव्हाचे पेरणी पाथर्डी तालुक्यात झाली आहे. सुमारे १२ हजार ३२३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल नगर, शेवगाव, कोपरगाव, राहाता, पारनेर, कर्जत, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा या तालुक्यांत गव्हाची पेरणी झाली आहे. जामखेड, श्रीगोंदा, अकोले तालुक्यात सर्वात कमी गव्हाची पेरणी झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे सहा हजार ७५७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ जुन्नर, दौंड, पुरंदर, इंदापूर या तालुक्यातही चांगली पेरणी झाली आहे. तर पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड, आंबेगाव या तालुक्यांत कमी गव्हाची पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. सुमारे ८ हजार २९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ या तालुक्यात पेरणी झाली आहे. तर पंढरपूर या तालुक्यात सर्वांत कमी गव्हाची पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT