विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट 
मुख्य बातम्या

विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट

टीम अॅग्रोवन

पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ८.९ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण गोव्याच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. येत्या मंगळवार (ता. २३)पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही गुरुवार (ता. २५)पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहील.

दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यादरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. भिरामध्ये १६.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत वाढ झाली.

तर नगरमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली असून, सर्वांत कमी म्हणजेच ११.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. मराठवाड्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. परभणीच्या कृषी विद्यापीठात ९.५ अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घटले आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे.

शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट  (अंश सेल्सिअस) मुंबई (सांताक्रूझ) १८.२ (१), अलिबाग २०.६ (३), रत्नागिरी १८.६, भिरा १६.५ (१), डहाणू १९.० (२), पुणे १२.३ (१), नगर ११.४ (-१), जळगाव १२.४ (१), कोल्हापूर १७.७ (३), महाबळेश्वर १४.६ (१), मालेगाव १५.५ (४), नाशिक १२.० (२), सांगली १६.२, सातारा १३.५, सोलापूर १६.७ (१), औरंगाबाद १४.० (३), बीड १३.६ (१), परभणी (कृषी विद्यापीठ) ९.५, परभणी शहर ११.८ (-३), नांदेड १३.० (-१), उस्मानाबाद १०.४, अकोला १४.०, अमरावती १४.२ (१), बुलडाणा १६.८ (२), ब्रह्मपुरी ८.९, चंद्रपूर ११.२ (-४), गोंदिया ९.३ (-४), नागपूर ९.८ (-४), वर्धा ११.५ (-२), यवतमाळ १३.४ (-२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT