मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : अरबी समुद्र व केरळच्या परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले आहे. मराठवाड्यातील परभणी शहर व विदर्भातील नागपूर शहरात हलक्या सरी बरसल्या. उर्वरित भागात हवामान ढगाळ झाले आहे. आज (ता. १३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता. १४) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. त्यामुळे राज्यात पुन्हा किंचित थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  सध्या मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच बांग्लादेशाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. राजस्थान परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. त्याचा परिणाम अजून एक ते दोन दिवस राहील.   चार ते पाच दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी रविवारी (ता. ११) गारपीट झाल्याचे चित्र होते. सोमवारी (ता. १२) विदर्भातील नागपूर येथे पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या. उर्वरित भागांत हवामान ढगाळ होते. मराठवाड्यातील परभणी शहराच्या परिसरात हलका पाऊस पडला, तर अनेक ठिकाणी सकाळी ढगाळ हवामान होते. दहानंतर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. मात्र, रविवारी झालेल्या गारपीट व पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढल्याने सोमवारी सकाळी मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागांत धुक्यांची चादर पसरली होती. मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात आकाश निरभ्र होते. कोकणातही आकाश निरभ्र होते.   कोकणात आकाश निरभ्र असल्याने किंचित थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड भागांत किंचित थंडी आहे. औरंगाबाद, बीड, जालना भागांत थंडी कमी झाली आहे. विदर्भात थंडीचा पारा हळूहळू वाढू लागला आहे.  मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.  सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १७.८, अलिबाग १८.६ (१), रत्नागिरी १७.३ (-२), भिरा १६.०, डहाणू १७.६, पुणे १३.३ (२), नगर १०.६ (-३), जळगाव १२.० (-२), कोल्हापूर १८.१ (२), महाबळेश्वर १५.७ (२), मालेगाव १४.५ (३), नाशिक १२.३ (१), निफाड ८.८, सांगली १६.१ (१), सातारा १४.०, सोलापूर १८.२, औरंगाबाद १४.६ (२), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १५.०, परभणी शहर १३.९ (-२), नांदेड १४.० (-१), उस्मानाबाद १३.६, अकोला १७.३(१), अमरावती १५.४ (-१), बुलडाणा १६.४, चंद्रपूर १८.४ (२), गोंदिया १५.०, नागपूर १५.५, वर्धा १७.५ (३), यवतमाळ १९.० (२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT