अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत 
मुख्य बातम्या

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत

Santosh Munde

पुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ येण्याचे संकेत आहेत. लक्षद्वीप बेटांच्या जवळच्या समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. बुधवारपर्यंत (ता. २३) या भागात चक्रीवादळ तयार होणार असून, हे चक्रीवादळ ओमानकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. अाग्नेय अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. त्याला लागूनच चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मंगळवारी या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार होणार असून, बुधवारी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २३ ते २६ मे या कालावधीत ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

राज्यात असलेल्या कोरड्या हवामानामुळे तापमानात वाढ होत असून, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला अाहे. विदर्भात लाट अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे. ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात कोरड्या व उष्ण हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सोमवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.२, जळगाव ४४.०, कोल्हापूर ३३.२, महाबळेश्वर ३०.८, मालेगाव ४४.८, नाशिक ३९.३, सांगली ३४.४, सातारा ३६.४, सोलापूर ४०.६, मुंबई ३५.४, अलिबाग ३३.९, रत्नागिरी ३३.७, डहाणू ३६.२, आैरंगाबाद ४१.७, परभणी ४५.०, नांदेड ४३.५, अकोला ४४.७, अमरावती ४४.६, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४७.१, चंद्रपूर ४७.८, गोंदिया ४४.२, नागपूर ४६.२, वर्धा ४५.६, यवतमाळ ४४.५.  अंदमानात मॉन्सून २३ एेवजी २५ला? नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) बुधवारपर्यंत (ता. २३) रोजी अंदमानात दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने यापूर्वीच दिले आहेत. मात्र हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे मॉन्सूनचे अागमन काहीसे लांबण्याची शक्यता आहे. सध्य स्थितीनुसार माॅन्सून वारे अंदमानात गुरुवारी (ता. २४) किंवा शुक्रवारी (ता. २५) दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. परिणामी शुक्रवारी (ता. २५) अंदमान निकोबार बेटांवर जाेरदार पावसाची शक्यता आहे. हवामानात हाेत असलेले बदल, वाऱ्यांची दिशा, पावसाचे प्रमाण यावर मॉन्सूनची वाटचाल ठरत असते. त्याचा मॉन्सूनच्या आगमनावरील परिणामावर हवामान शास्त्रज्ञ सातत्याने लक्ष ठेऊन आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT