मुळा, भंडारदराचे आवर्तन १५ जानेवारीपासून Water will be released for irrigation from January 15
मुळा, भंडारदराचे आवर्तन १५ जानेवारीपासून Water will be released for irrigation from January 15 
मुख्य बातम्या

मुळा, भंडारदराचे आवर्तन १५ जानेवारीपासून

टीम अॅग्रोवन

पुणे नगर : नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा धरणातून शेती सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन साधारण पंधरा जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रब्बी हंगामात एक व उन्हाळी हंगामात दोन आवर्तनांच्या संभाव्य तारखांवर निश्चित करण्यात आल्या.  नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कालवा सल्लागार समितीची बैठक लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यात सहभागी झाले होते. मुळा धरणात पिण्याचे व औद्योगिक वापराचे आरक्षित पाणी तसेच बाष्पीभवन व अचल (मृत) साठा वगळता १४ हजार ५०० दशलक्ष घनफूट सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामात एक व उन्हाळी हंगामात दोन आवर्तनाचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.  उजव्या कालव्याचे प्रत्येक आवर्तन ४० दिवस चालेल. राहुरी, नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ३० हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन होईल. उजव्या कालव्यातून रब्बीसाठी चार हजार दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी नऊ हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल. डाव्या कालव्याचे आवर्तन २० ते २५ दिवसांचे राहील. राहुरी तालुक्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन होईल. डाव्या कालव्यातून रब्बीसाठी ५०० दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी एक हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल. भंडारदरा, निळवंडे धरणातून साधारण १८ टीएमसी पाणी उपलब्ध असेल. त्यातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाच आवर्तने सोडण्याची शक्यता आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT