Water supply started by 324 tankers in Marathwada
Water supply started by 324 tankers in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात ३२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील २५१ गाव व ९८ वाड्यांतील ५ लाख ८१ हजार ९५० लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी ३२४ टँकर सुरू आहेत. जवळपास १००८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील १३६ गावे व २७ वाड्यांमधील २ लाख ९० हजार ११७ लोकांना पाणीटंचाई भासत आहे. म्हणून १२० टँकर सुरू आहेत. १४२ विहिरीचे टँकर व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर हे तालुके टंचाईचा रडारवर आहेत. जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, जाफराबाद, अंबड या चार तालुक्यांतील २९ गावे व ११ वाड्यांमधील ६९७५९ लोकांना पाणी टंचाई भासते आहे. तिथे ४१ टँकर सुरू आहेत. ६४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

परभणी जिल्ह्यातील एका गावातील २५०० लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी एका टँकरद्वारे णीपुरवठा सुरू आहे. याशिवाय ३३ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार, मुखेड, किनवट तालुक्यातील ३ गाव व १५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. या १८ गावे, वाड्यांमधील १९७१५ लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी १३ टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील १११ विहिरीचे अधिग्रहण केले आहे. 

बीड जिल्ह्यातील वडवणी व परळी वगळता सर्व तालुक्यातील ६६ गाव व ४५ वाड्यांमधील १८०८९३ लोकांना पाणीटंचाईचा जाणवत आहे. पाणी पुरवण्यासाठी १२१ टँकरची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील दोन गावातील ४१०२ लोकांना पाणी टंचाई भासत आहे. त्यांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी दोन टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. जिल्ह्यातील २६९ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले.  उस्मानाबादच्या १४ गावांत टंचाई

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, कळंब, भूम, परंडा या तालुक्यातील १४ गावांमधील १२ हजार ९६४ लोकांना पाणी भासत आहे. ही टंचाई निवारण्यासाठी १६ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील २१२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातर्फे देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT