जलयुक्त शिवार योजना
जलयुक्त शिवार योजना  
मुख्य बातम्या

जलयुक्त, शेततळी, गाळमुक्त धरणांमुळे पाण्याचा मोठा साठा

टीम अॅग्रोवन

मुंबई: मुंबई, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आपत्ती निवारण उपाययोजनेद्वारे शासन यंत्रणा मात करीत असताना, उर्वरित भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याबाबत आशादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आणि गाळमुक्त धरण या योजनांद्वारे राज्यात झालेल्या कामांमुळे पुढच्या वर्षासाठी पाण्याची भरीव साठा झाला असल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे.  बहुतांश भागांत सर्वदूर होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे गाव शिवारांत झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतील नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, सिमेंट नालाबांध, ओढा खोलीकरण, ओढा सरळीकरण, सीसीटी पाण्याने भरले आहेत. गावशिवारातील विहिरी पाण्याने भरल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी हे पैठण येथे असणारे मोठे धरण आहे. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर विविध धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. रविवार सकाळपर्यंत जायकवाडी धरणातील पाण्याची टक्केवारी १५ टक्के इतकी होती. नाशिक नगर जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे जायकवाडीमध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मराठवाड्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे विभागात सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता सातारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. कोयना धरणात रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ९४.९४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, उजनी धरणातही ८८.७९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील १० धरणांमधून प्रति सेकंद ३७ हजार ६०२ घनफूट विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात देवळा, कळवण, चांदवड आणि नांदगाव वगळता इतर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. गंगापूर, दारणा, चणकापूर, कडवा, मुकणे, करंजवण या मोठ्या प्रकल्पांत चांगला जलसाठा झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २७० मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा आणि आढळा धरणे भरली आहेत. मुळा आणि निळवंडे धरण क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने तीदेखील भरण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पापैकी हतनूर धरणात १९ टक्के गिरणा धरणात १३ टक्के, तर वाघूर धरणात ३० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पापैकी गूळ, मन्याड, सुकी प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा असून, तोंडापूर धरण १०० टक्के भरले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मालनगाव, पांझरा, जामखेडी धरण १०० टक्के भरले आहे.  कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील सर्व लघू पाटबंधारे प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तर १९ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एक व राजापूर तालुक्यात एक आणि संगमेश्वर तालुक्यात एक असे तीन मध्यम पाटबंधारेप्रकल्प असून, तिन्हींमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय जिल्ह्यात ६० लघुपाटबंधारे प्रकल्प असून, ६० लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी ४८ लघुपाटबंधारे शंभर टक्के भरले आहेत. नागपूर विभागात २४.९५ टक्के पाणीसाठा नागपूर विभागात एकूण १८ मोठी धरणे असून, ४० मध्यम प्रकल्प, ३१४ लघू प्रकल्प आहेत. यातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण २६.४७ टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. नागपूर विभागातील ४० मध्यम प्रकल्पांतील एकूण पाणीसाठ्याची नोंद ४४.३७ झाली आहे. अमरावती विभागात ९ मोठे २४ मध्यम, तर ४६९ लघुप्रकल्प आहेत. ९ प्रकल्पांत मिळून सरासरी २३.४ टक्के पाणीसाठा झाला आहे. विभागातील २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ४०.८५ टक्के पाणीसाठा झालेला आहे. विभागातील ४६९ लघुप्रकल्पांत १७.१३ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ५०२ प्रकल्पांतील पाणीसाठ्याची टक्केवारी २४.९५ टक्के एवढी आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT