पुणे विभागात पाणीटंचाईचा उन्हाळी चारा पिकांना फटका
पुणे विभागात पाणीटंचाईचा उन्हाळी चारा पिकांना फटका  
मुख्य बातम्या

पुणे विभागात पाणीटंचाईचा उन्हाळी चारा पिकांना फटका 

टीम अॅग्रोवन

पुणे ः उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. याचा फटका जनावरांसाठी लागणाऱ्या चारा पिकांच्या क्षेत्रालाही बसला आहे. पुणे विभागात उन्हाळी हंगामात पाणीटंचाईमुळे अवघ्या ११ हजार ४८५ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पादन घट होऊन पुढील दोन महिन्यांत चाऱ्यांचा मोठा प्रश्न उपस्थित राहण्याची शक्यता आहे.   

पाणीटंचाईमुळे रब्बी हंगामात अवघ्या ९१ हजार २१० हेक्टरवर चारा पिकांची कमी क्षेत्रावर पेरणी होती. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून, डिसेंबर जानेवारीपासून चाराटंचाई भेडसावण्यास सुरवात झाली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या एक ते दीड महिन्यापासून चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. सोलापूर, पुणे या भागांतही अजूनही छावण्या सुरू झाल्या नसल्या, तरी चाराटंचाई चांगलीच सुरू झाली आहे. 

विभागात दरवर्षी मे, जून आणि जुलै महिन्यांत चारा उपलब्ध होण्यासाठी उन्हाळी हंगामात मार्च महिन्यात मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. चारा पिकांच्या लागवडीनंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यांनंतर चाऱ्यांचे उत्पादन होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस व पावसाळ्याच्या तोंडावर चाराटंचाई कमी होण्यास मदत होत होते. 

पुणे जिल्ह्यातही अवघ्या ३ हजार ९२३ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये हवेली, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, परंदर या तालुक्यांत चारा पिकांची लागवड झाली आहे. उर्वरित तालुक्यात चारा पिकांची लागवड झालेली नाही. 

सोलापूर जिल्ह्यात अत्यंत कमी क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात अवघ्या ५ हजार ४४ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे.

नगरमध्ये केवळ अडीच हजार हेक्टरवर चारा पिके उन्हाळी हंगामात नगर जिल्ह्यात २ हजार ५१८ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली. यामध्ये श्रीगोंदा, पाथर्डी, संगमनेर या तीन तालुक्यांत चारा पिकांची लागवड झाली आहे. उर्वरित तालुक्यात पाणीटंचाईमुळे चारा पिकांची लागवड झालेली नाही. त्यामुळे या भागात चाराटंचाई चांगलीच भेडसावण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT