पाणीटंचाई
पाणीटंचाई 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषण

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात पाणीटंचाई तीव्र होत आहे. आजघडीला ११५ गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली असून, महिनाभरात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत सुमारे ४० ने भर पडली आहे.टंचाईग्रस्त गावांमध्ये ९१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

अमळनेर तालुक्‍यात सर्वाधिक ४५ गावे टंचाईग्रस्त आहेत. चोपडा, धरणगाव, भडगाव तालुक्‍यात एकही गाव टंचाईग्रस्त नाही. परंतु या तालुक्‍यांमध्येही पाणीपातळी घटली आहे. अमळनेर तालुक्‍यातील मंगरूळ, जानवे, कावपिंप्री, इंद्रापिंप्री, सारबेटे बुद्रुक, सारबेटे खुर्द, गडखांब, डांगर, पिंपळे खुर्द, वाघोदा, जैतपीर, सबगव्हाण, खेडी खुर्द, वासरे, भरवस, लोण, पंचम, मालपूर, ढेकू खुर्द, अटाळे, शिरसाळे, पिंपळी, गलावाडे, आर्डी अनोरे, निसर्डी, देवगाव देवळी, गलवाडे खुर्द, धानोरा, नगाव, सुंदरपट्टी, कचरे, बोरगाव, दरेगाव आदी गावांमध्ये टंचाईस्थिती बिकट बनत चालली आहे.

जामनेर तालुक्‍यातील २७ गावांमध्ये टंचाई असून, २६ टॅंकर सुरू आहेत. ४० गावांमध्ये टंचाई निवारणार्थ विहिरी अधीग्रहीत केल्याची माहिती मिळाली आहे. भडगाव तालुक्‍यात टंचाईची स्थिती कमी आहे. परंतु शेतशिवारात पाण्याची समस्या वाढली आहे.

पाचोऱ्यातही शेतशिवारात पाणी पुरेसे नसल्याने कापूस व केळी लागवडीवर परिणाम झाला आहे. पाचोरा व भडगाव तालुक्‍याला गिरणा धरणातून नदीत पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा आधार झाला. बोदवड तालुक्‍यात भीषण पाणीटंचाई असून, हा तालुका दुष्काळी आहे. त्यातच पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड भटकंती शेतकरी, ग्रामस्थांना करावी लागत आहे.

बोदवड तालुक्‍यात एकच गाव टंचाईग्रस्त आहे. परंतु पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. चाळीसगाव तालुक्‍यात १० गावांमध्ये टंचाई आहे. ९० गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. घोडेगाव, पिंपळगाव, करजगाव, कृष्णनगर, हातगाव, अंधारी, हिरापूर, चितेगाव, वाघळी, तमगव्हाण, दरा तांडा, लोंढे या गावांमध्ये पाण्याची समस्या वाढली आहे. अनेक गावांमध्ये वापरण्यासाठीचे ३०० लिटर पाणी ५० ते ६० रुपयांना मिळू लागले आहे.

यावल तालुक्‍यातील हिंगोणा व सातपुडा पर्वतातील पाड्यांमध्ये पाणीसंकट आहे. हिंगोणा येथे कृत्रीम टंचाई आहे. नियोजन विस्कळीत असून, नळ जोडण्यांबाबतही तक्रारी या गावात आहेत. तर रावेरात पाणीटंचाई नसली तरी हतनूर धरणातील साठा घटू लागला आहे. हा साठा फक्त साडेसहा टक्‍क्‍यांवर आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT