अमरावती विद्यापीठ साधणार जलसंधारण
अमरावती विद्यापीठ साधणार जलसंधारण 
मुख्य बातम्या

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार जलसंधारण

टीम अॅग्रोवन

अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर दोन तलाव, नाला आणि सात शेततळ्यांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शासनाला दिला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून याकरिता निधीची मागणी करण्यात आली आहे.  अमरावती जिल्ह्यात पाणीसंकट गडद झाले आहे. जनसामान्य, विविध शासकीय विभागांसोबतच अमरावती विद्यापीठाला देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात विद्यापीठ परिसरातील दोन्ही तलावांचे पाणी फेब्रुवारीमध्येच संपत तलाव कोरडे पडले. परिणामी, विद्यापीठ परिसरातील हिरवळ कायम ठेवणे व बागेचे संवर्धन तसेच इतर कामांसाठी पाणी उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण झाला. दोन महिन्यांपासून ही आव्हानात्मकस्थिती आहे. तलावात पाणी नसल्याने विद्यापीठ परिसरातील पक्षी व जनावरांना देखील तृष्णा भागविण्यात अडचण आहे. दरवर्षी मे अखेरपर्यंत तलावात पाणीसाठा राहतो. यंदा मात्र पाण्यासंदर्भात फारच विपरीत परिस्थिती विद्यापीठासमोर निर्माण झाली आहे. जुन्या दोन विहिरी असून, त्यातील पाण्याचा वापर उद्यान विभागासाठी करण्यात येत आहे. मात्र, या विहिरींनी देखील तळ गाठला. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यावर यापुढे भर देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांत दरदिवशी ४ ते ५ लाख लिटर पाण्याचा वापर होतो. या पाण्यावर ट्रिटमेंट करून त्याचा उद्यान विभागासाठी वापर केला जाईल. रेन वॉटर हार्वेस्‍टिंग आणि पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. 

जलसंधारण समितीचे गठण विद्यापीठात दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जलसंधारण समितीचे गठण करण्यात आले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत ही समिती आहे. समितीत जलतज्ज्ञ खानापूरकर, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता बांबल, पाणीपुरवठा विभागाचे मावळे, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT