should plant one sapling each for Ashadhi: Sayaji Shinde 
मुख्य बातम्या

आषाढीनिमित्त वारकऱ्यांनी प्रत्येकी एक रोप लावावे ः सयाजी शिंदे

कोरोना संसर्गाने या वर्षी आषाढी वारी होणार नाही. परंतु, संतांना अपेक्षित वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांनी प्रत्येकी एक रोप लावावे. आषाढी एकादशीदिवशी या रोपाची संत व पांडुरंग म्हणून पूजा करावी, असे आवाहन सिने अभिनेते व सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी केले.

टीम अॅग्रोवन

नातेपुते, जि. सोलापूर : कोरोना संसर्गाने या वर्षी आषाढी वारी होणार नाही. परंतु, संतांना अपेक्षित वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांनी प्रत्येकी एक रोप लावावे. आषाढी एकादशीदिवशी या रोपाची संत व पांडुरंग म्हणून पूजा करावी, असे आवाहन सिने अभिनेते व सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी केले.

संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गालगत मुक्कामाच्या गावांत वृक्षारोपणाचा प्रारंभ सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आळंदी देवस्थानचे विश्‍वस्त व पालखी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे-पाटील, पंढरपूर देवस्थानचे विश्‍वस्त शिवाजीराव मोरे, तुकाराम महाराज मोरे, देवस्थानचे विश्‍वस्त मधुकर मोरे, अजित मोरे, सह्याद्री देवराईचे रोहित पाटील, रघुनाथ ढोले, किशोर ठाकूर, आळंदी देवस्थानचे मनोहर अवचर, बाळकृष्ण मोरे व नातेपुतेचे सरपंच भानुदास राऊत आदी उपस्थित होते.

अभिनेते शिंदे म्हणाले, परदेशी रोपांची लागवड अजिबात करू नका. देशी रोप प्रत्येकाने लावावे. विशेषत: आवळा, लिंब, वड, चिंच, आंबा, पिंपळ, उंबर आदी देशी रोपे लावावीत. या चळवळीत माझा कोणताही राजकीय हेतू नाही. वृक्ष लागवड ही माझी आवडती गोष्ट आहे. संतांच्या आवडीचा हा विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने विशेषत: माळकरी व्यक्तींनी संतांच्या नावावर एक तरी रोप लावावे.

श्री. ढगे यांनी आळंदी देवस्थान पालखीतील ४२५ व देहू देवस्थानच्या पालखीतील ३२९ दिंड्या आहेत. प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांनी आपल्या गावात हा उपक्रम राबवावा, असे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT