हमीभावात सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा
हमीभावात सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा 
मुख्य बातम्या

हमीभावात सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात शासकीय खरेदी केंद्रात कडधान्य व सोयाबीन विक्रीसंबंधीच्या ऑनलाइन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, सुमारे आठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. खरेदीला विलंब होत असून, खरेदी केंद्राबाबत कार्यवाही सुरू करावी. सोयाबीनची खरेदीही लागलीच सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत असून त्यांना खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

कडधान्याचे उत्पादन कमी आले. परंतु काळ्या कसदार जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले धान्य साठवून ठेवले आहे. त्यांनी निर्देशित शासकीय खरेदी केंद्रात ऑनलाइन नोंदणी करून घेतली आहे. ही नोंदणी अडखळत सुरू होती, यामुळे शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत होत्या. नोंदणीचे संदेश अनेक शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवर आले. आता खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

सोयाबीनच्या विक्रीसाठी सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहील. सोयाबीन खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी तुळशीराम मराठे (पाचोरा) यांनी केली आहे. शासकीय खरेदी सुरू होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बाजारात सध्या उडीद व मुगाला प्रतिक्विंटल ५१०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. तर सोयाबीनचे दरही ३२०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे शासनाने खरेदी केंद्रांना विलंब करू नये, असेही शेतकऱ्यांची मागणी आहे. 

आवक घटली सध्या बाजारात कडधान्याची आवक कमी आहे. चोपडा, अमळनेर व पाचोरा वगळता इतरत्र किरकोळ आवक होत आहे. सोयाबीनची आवक मात्र चोपडा, अमळनेर व जळगाव बाजारात होत आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT