खानदेशातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची प्रतीक्षा
खानदेशातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची प्रतीक्षा 
मुख्य बातम्या

खानदेशातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात कांदा अनुदानापासून अजूनही शेतकरी वंचित आहेत. दोन महिन्यांपूर्वी बाजार समितीमध्ये अर्ज सादर केले. परंतु, बॅंक खात्यावर अनुदान प्राप्त झाले नाही. धुळे, जळगाव जिल्ह्यांतून सुमारे १२ हजारांवर शेतकऱ्यांचे अर्ज या अनुदानासाठी सादर झाल्याची माहिती आहे. 

अर्ज सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. मार्चमध्येही अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती. ज्यांनी जानेवारी व फेब्रुवारीत अर्ज सादर केले, त्या शेतकऱ्यांनादेखील हे अनुदान मिळाले नाही. सध्या निवडणुकांच्या धामधुमीत या अनुदानाप्रश्‍नी कुणी स्पष्टीकरण द्यायला तयार नाही. बाजार समितीमधील कर्मचारी व्यवस्थित माहिती देत नाहीत. शासनाकडून हे अनुदान थेट बॅंक खात्यात येईल, असे सांगितले जाते. 

अनुदानासाठी शेतकरी दोन-तीन दिवसाआड संबंधित बॅंक, बाजार समिती व सहायक निबंधक कार्यालयात चकरा मारत आहेत. एकाही अर्जदारास हे अनुदान प्राप्त झाले नाही. २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे अनुदान कमाल २०० क्विंटलसाठी एका शेतकऱ्याला मिळणार आहे. काही शेतकऱ्यांनी दोन ते अडीच एकर लागवड केली होती. त्यांना ३०० क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळाले आहे. नियमांची अडचण असतानाच अनुदानही मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघाले नाही. 

यासंदर्भातील तक्रार स्थानिक आमदार, खासदार यांच्याकडेही करता येत नाही. कारण, ते आता निवडणुकीत व्यस्त आहेत. बॅंक खाती व अनुदान मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केल्याचे दावे सहायक निबंधक व बाजार समितीमधील कर्मचारी करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT