वाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः खासदार उन्मेष पाटील
वाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः खासदार उन्मेष पाटील  
मुख्य बातम्या

वाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः खासदार उन्मेष पाटील

टीम अॅग्रोवन

जळगाव : वाघूर धरणातून धरण लाभक्षेत्रात शेतीसाठी आवर्तन सोडण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून, उपलब्ध जलसाठा व इतर बाबी लक्षात घेऊन कापूस लागवडीसाठी या धरणाचे आवर्तन सोडण्याचे आश्‍वासन खासदार उन्मेष पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. वाघूरच्या आवर्तनाच्या मागणीसाठी जळगाव तालुक्‍यातील नशिराबादसह परिसरातील ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. काळ्या फिती लावून ग्रामस्थ व शेतकरी दिवसभर बसून होते. या उपोषणाची दखल प्रशासन व खासदार यांनी घेतली व आश्‍वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.  गेल्या मे महिन्यात वाघूर लाभधारक समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची दोनवेळा भेट घेऊन वाघूरमधून उन्हाळी कापूस व अन्य पिकांसाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. पिण्यासाठी साठा आरक्षित ठेवूनही आवर्तन सोडता येऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अहवालानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, आवर्तन सोडण्याबाबत आधी सकारात्मक अहवाल आला, नंतर तो नकारात्मक देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.  वाघूर धरण लाभधारक समिती सदस्य, पदाधिकारी व नशिराबादसह आसोदा, तरसोद, भादली व अन्य परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, किशोर चौधरी, पंकज महाजन, राजू महाजन, राजेंद्र चौधरी, संतोष नारखेडे, तुषार महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. 

जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र  या उपोषणानंतर समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. धरणातून पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत साठा आरक्षित आहे. या राखीव पाण्याव्यतिरिक्त धरणात पाणीसाठा असेल तर पाणी सोडण्यास हरकत नाही, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिले आहे, अशी माहिती मिळाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT