विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्त
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्त 
मुख्य बातम्या

विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्त

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची बदली झाल्यानंतर नवे आयुक्त येण्यापूर्वीच त्यांनी आयुक्तालय सोडले. आता कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने यांच्याकडे आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे देण्यात आली आहेत.

कृषी आयुक्तालयात सोमवारी (ता.१३) नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या. श्री. दिवसे यांनी पीएमआरडीच्या मुख्य कार्यकारी अधिकारिपदाची सूत्रे हाती घेतली. विशेष म्हणजे बदलीबाबत श्री. दिवसे यांनी स्वतःही आश्चर्य व्यक्त केले. नव्या आयुक्तांबाबत संभ्रमावस्था आहे. ‘‘श्री. दिवसे यांची बदली कोणालाही अपेक्षित नव्हती. खरीप हंगाम सुरू असल्यामुळे तसेच राज्याच्या कृषी क्षेत्रात सध्या घडामोडी होत असल्याने बदली झाली तरी ते लगेच पदभार सोडतील असे वाटत नव्हते. तसेच प्रभारी आयुक्त शेखर गायकवाड असतील, अशी देखील अटकळ होती. मात्र, सर्व घडामोडी अनपेक्षित आहेत,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

बदली झाली तरी कामकाजातील अडचणी समजावून घेत श्री. दिवसे यांच्याकडून महत्त्वाच्या मुद्यांबाबत सूचना केल्या जात होत्या. नवे आयुक्त येईपर्यंत कामकाजावर लक्ष ठेवण्याच्या सूचना श्री. दिवसे यांना मंत्रालयातून देण्यात आल्या होत्या. तथापि, त्यांनी सोमवारी तातडीने बदली झालेल्या नव्या कार्यालयाची सूत्रे स्विकारली. आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, श्री. दिवसे यांच्या बदलीमुळे कर्मचारी व अधिकारी नाराज आहेत. मनमिळाऊ व पारदर्शक कारभारामुळे राज्यात कृषी यंत्रणा पूर्वपदावर येत होती. मात्र, ऐन खरिपात बदली केल्यामुळे कामकाज विस्कळीत होणार आहे. खूप काम करायचे होतेः दिवसे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत श्री. दिवसे यांना निरोप देण्यात आला. ‘‘मला शेती आणि शेतकऱ्यांसाठी खूप काम करण्याची इच्छा होती. स्मार्टसारखे काही प्रकल्प साकारायचे होते. केंद्राचे नवे प्रक्रिया धोरण देखील राबवायचे होते. मात्र, बदली झाल्याने सर्व काही सोडून जावे लागत आहे,’’ असे ते म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT