The villages of Manu taluka will move towards water resources
The villages of Manu taluka will move towards water resources 
मुख्य बातम्या

माण तालुक्यातील गावांची जलसंपन्नतेकडे वाटचाल

टीम अॅग्रोवन

गोंदवले, जि. सातारा : नेहमीचाच दुष्काळ... त्याला लागून येणारी संकटे... आणि जीवन जगण्यासाठीची धडपड... हे चित्र आता बदलण्याची आशा माण तालुक्यातील काही गावांमध्ये निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ योजनेला आता मूर्त रूप येऊ लागले आहे. इतकेच नव्हे तर जलसंधारणाच्या यशस्वी कार्यक्रमामुळे काही गावे स्वावलंबनकडे वाटचाल करू लागली आहेत. 

शासनाने कायमस्वरूपी पाणी देण्यासाठीच्या उरमोडी योजनेतून आता पाणी उपलब्ध झाले. जिहे- कठापूर योजनाही पूर्ण होईलच; परंतु याखेरीज पावसाचे पाणी अडविण्यासाठी गेल्या काही वर्षांत क्रांती घडली. लोकांचा उत्स्फूर्त सहभागातून तालुक्‍यातील बहुतांशी गावात जलसंधारणाची कामे केवळ हाती न घेता पुढाकाराने पूर्ण करण्यात आली. गेल्या वर्षी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ६६ गावे ‘वॉटर कप’ स्पर्धेत उतरली. 

या प्रत्येक गावात स्पर्धा होती. मात्र, ती पाणी मिळविण्याचीच. यात सर्वच गावे यशस्वीही झाली. यंदा झालेल्या पावसाने तर या कार्यक्रमाला बळकटी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. निरंतर झालेल्या जलसंधारण कामाने लोधवडे स्वयंपूर्ण झालेच; शिवाय इतर गावांसाठीही ते जलसंजीवन बनले. याशिवाय बिदाल, टाकेवाडी, बनगरवाडी, भांडवली, मार्डी, इंजबाव, किरकसाल, वाघमोडेवाडी ही गावे पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाली आहेत. 

याशिवाय काळेवाडी, धामणी, चिलारवाडी, महाबळेश्वरवाडी, पानवण, कारखेल, दिवड, नरवणे, कुकुडवाड, अनभुलेवाडी, कळसकरवाडी, गाडेवाडी, शिंदी, परकंदी, कासारवाडी, स्वरूपखानवाडी, बोथे, जाधववाडी, वावरहिरे, भाटकी, रांजणी, गोंदवले खुर्द, पिंगळी या गावांनीही जमिनीत पाणी साठविण्याची किमया करून दाखवली. 

यंदा दमदार पावसाने पाणी अडविण्यात यश आले. खोदलेल्या समतल चरी पाण्याने भरून वाहिल्या, तर नालाबांध, दगडी बांध, पाझर तलावही पूर्ण भरले आहे.  कधी नव्हे ती माण नदीही अनेक वर्षांनी वाहिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून जमिनीतील खालावलेली पाणीपातळीही वाढली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT