विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडी वाढणार
विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडी वाढणार 
मुख्य बातम्या

विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडी वाढणार

टीम अॅग्रोवन

पुणे  : यंदाचे वर्ष संपत आले असून, नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना मध्य महाराष्ट्र व विदर्भात थंडी वाढणार आहे. विदर्भासह, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहणार असून, किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरलेलाच राहणार आहे. बुधवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यत विदर्भातील गोंदिया येथे ८.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  उत्तरेकडून वाहत असलेला थंड वाऱ्यांचा प्रवाह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कायम आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यत (ता. ३१) थंडी राहील. उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात उद्यापासून तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होईल. त्यानंतर हळूहळू थंडी कमी होऊन किमान तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच   अंशांनी घट झाली असून, किमान तापमान ८.९ अंशांपर्यंत खाली आले होते. नागपुरातही किमान तापमान दहा अंशांच्या दरम्यान होते.  पूर्वेकडून वाहत असलेल्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व कर्नाटकाचा दक्षिण परिसर या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावरून दमट वाऱ्यांचे प्रवाह मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, कोकण व मराठवाड्याच्या दिशेने वाहत असल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. या भागातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तीन ते पाच अंशांनी वाढले असून, किमान तापमान १४ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मालेगाव व नांदेड येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांनी वाढले आहे.    बुधवारी (ता. २६) सकाळपर्यत विविध शहरातील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  सांताक्रूझ १७.४ (-१), अलिबाग १८.८ (१), रत्नागिरी १९.९, डहाणू १८.८ (१), पुणे १४ (३), जळगाव ११.१ (-१), कोल्हापूर १९.२ (४), महाबळेश्‍वर १४.३ (१), मालेगाव १५.६ (५), नाशिक १२.६ (३), सांगली १७.१ (३), सातारा १६.९ (४), सोलापूर १९.६ (४), औरंगाबाद १४.३ (३), परभणी १६.१ (२), उस्मानाबाद १६.१, नांदेड १७ (५), अकोला १६.१ (३), अमरावती १४.२ (-१), बुलडाणा ८.९ (-५), चंद्रपूर ११.४ (-२), गोंदिया ८.८ (-३), नागपूर १०.९ (-२), वर्धा १४.५ (१), यवतमाळ १२.० (-३)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT