धान उत्पादकांना बोनस कधी?
धान उत्पादकांना बोनस कधी? 
मुख्य बातम्या

धान उत्पादकांना बोनस कधी?

Vinod Ingole

नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत हमीदरात ८०० रुपये क्‍विंटलची तूट असताना अद्याप धाना (भात)ला शासन स्तरावरून बोनस जाहीर करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. पूर्व विदर्भातील दीड लाखावर शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत असून, लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याच्या पूर्वी तो मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, पूर्व विदर्भात सुमारे सहा लाख हेक्‍टरवर धानाची लागवड होते. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हे धान उत्पादक जिल्हे आहेत. या भागातील हे मुख्य पीक असल्याने याच पिकावर या भागातील अर्थव्यवसथा अवलंबून आहे. बदलते हवामान, त्यामुळे अनिश्‍चित झालेला पाऊस, निविष्ठांच्या किमतीमधील वाढ यामुळे धानाचा उत्पादकता खर्च वाढला. मात्र त्या तुलनेत हमीभाव मिळत नसल्याने धानाची शेती घाट्याचा सौदा ठरत आहे.  केंद्र सरकारने मागील पाच वर्षात धानाच्या हमीभावात केवळ २५० रुपयांची वाढ केली. त्या तुलनेत धानाच्या लागवड खर्चात पाच ते सातपट वाढ झाली. यंदा शासनाने ‘अ’''दर्जाच्या धानाला १७७० तर सर्वसाधारण धानाला १७५० रुपये हमीभाव जाहीर केला. लगतच्या छत्तीसगड राज्यात कॉंग्रेसने धानाला प्रति क्‍विंटल २५००रुपये हमीभाव जाहीर केला. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या हमीभावात प्रति क्‍विंटल ८०० रुपयांची तफावत आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारप्रती तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सरकारकडून बोनस जाहीर होईल आणि दरातील तूट भरून काढली जाईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. साधारणतः डिसेंबर महिन्यात बोनसची घोषणा होते. परंतू यावर्षी खरेदी सुरू होऊन चार महिने लोटले तरी बोनस जाहिर करण्यात आला नाही. गेल्या वर्षी शासनाने प्रति क्‍विंटल २०० रुपये बोनस दिला होता. छत्तीसगड राज्य सरकारच्या भूमिकेमुळे यावर्षी तो ५०० रुपयांपर्यंत दिला जाण्याची शक्‍यता आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी हा बोनस देत शेतकऱ्यांमधील रोष शमविण्याचा प्रयत्न सरकार करेल, अशीही चर्चा आहे. ३० क्‍विंटलपेक्षा जास्त धान खरेदी पूर्व विदर्भात सहा लाख हेक्‍टरवर धान लागवड होते. या वर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरशेन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्व विदर्भात सुमारे २५० हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दीड लाखावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री या केंद्रावर केली असून ३० लाख क्‍विंटलपेक्षा धान खरेदी झाल्याचे सांगितले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT