Vidarbha, mid-temperature over forty 
मुख्य बातम्या

विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तापमान चाळिशी पार

कमाल तापमान चाळिशी पार पोचल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणखी वाढला आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

टीम अॅग्रोवन

पुणे : कमाल तापमान चाळिशी पार पोचल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणखी वाढला आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २६) राज्यात उन्हाचe ताप वाढणार आहे. तर तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे राज्यात सातत्याने उन्हाच्या झळा वाढतच आहेत. विदर्भासह राज्यात कमाल तापमानासह, ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. नगर येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, तापमानात सरासरीपेक्षा ५.१ अंशांची वाढ झाल्याने तेथे उष्णतेची लाट आली आहे.

दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. तर पश्चिम विदर्भापासून, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडूपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून,  आज (ता. २६) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 

शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.८, नगर ४१.५, धुळे ३९.०, जळगाव ४०.२, कोल्हापूर ३४.८, महाबळेश्वर २८.८, नाशिक ३७.२, निफाड ३६.८, सांगली ३६.४, सातारा ३७.१, सोलापूर ४०.५, सांताक्रूझ ३५.३, डहाणू ३२.२, रत्नागिरी ३२.५, औरंगाबाद ३८.४, नांदेड ३९.०, परभणी ३९.०, अकोला ४२.०, अमरावती ४१.२, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४०.२, चंद्रपूर ४०.६, गोंदिया ३८.४, नागपूर ३८.२, वर्धा ३९.०, यवतमाळ ३९.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT