On a vertical crop of papaya Rotated rotavator 
मुख्य बातम्या

पपईच्या उभ्या पिकावर  फिरवला रोटाव्हेटर 

रोपवाटिकेतून पुरवण्यात आलेल्या रोपांच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे काढणीस आलेल्या फळांमध्ये विकृती दिसून येत असल्याने व्यापाऱ्यांकडून खरेदीस नापसंदी येत आहे.

टीम अॅग्रोवन

मालेगाव कॅम्प, जि. नाशिक : मालेगाव तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र चालू वर्षी पिंपळगाव दाभाडी परिसरातील शेतकऱ्यांना रोपवाटिकेतून पुरवण्यात आलेल्या रोपांच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे काढणीस आलेल्या फळांमध्ये विकृती दिसून येत असल्याने व्यापाऱ्यांकडून खरेदीस नापसंदी येत आहे. पपई रोपात फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांवर उभी बाग रोटाव्हेटरने मुळासकट काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.        तालुक्यातील अजंग शिवारातील पिंपळगाव परिसरातील पपई उत्पादक शेखर पवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी आठ महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील खासगी रोपवाटिकेमधून एका वाणाची पपई रोपे मागवली होती. मात्र लागवड केल्यानंतर फळांची काढणी सुरू झाली. मात्र फळांमध्ये आकार, रंग यात एक सारखापणाचा अभाव आल्याने खरेदीत उठाव नव्हता. व्यापारी खरेदीसाठी नकार देत असल्याने शेतकऱ्यांनी हतबलत झाले. रोपात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर थेट उभ्या पिकावर रोटर चालविण्याचा निर्णय परिसरातील १० ते १५ शेतकऱ्यांनी घेतला. उत्पादन खर्च करून पिकाचे संगोपन करून हाती काहीच येत नसल्याने कष्टाने उभ्या केलेल्या लागवडी उद्ध्वस्त करण्याची वेळ येथील पपई उत्पादकांवर आली आहे.  लागवडी दरम्यान हंगामी नियोजन, खत व्यवस्थापन करून ऐन काढणी सुरू होताच फळांची गुणवत्ता नसल्याने व्यापारी वर्गाने हे फळ घेण्यास नकार दिला. संबंधित बियाणांच्या पपईत टिकाव धरून ठेवण्याची क्षमता नसल्याने व्यापारी माल घेत नव्हते. परिणामी बाजारात उठाव नसल्याने उत्पादक शेखर पवार यांनी उभ्या फळबागेत रोटर फिरवत बाग भुईसपाट केली. त्यामुळे लाखोंचे आर्थिक नुकसान आणि हंगाम वाया गेल्याचा फटका या शेतकऱ्यास सोसावा लागला आहे. 

प्रतिक्रिया 

रोप खरेदी, लागवड, मजुरी आणि कष्ट सारेच मातीमोल ठरल्याने हतबल होण्याची वेळ आली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलो आहे.  -शेखर पवार, पपई उत्पादक शेतकरी, पिंपळगाव दाभाडी, ता. मालेगाव 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Jeevan Mission : वीज जोडणीअभावी रखडले जलजीवन मिशन योजनेचे काम

Sugarcane Damage : आडव्या उसासाठी हवी मदत

Rain Crop Damage : नाशिक विभागात ८ लाख शेतकऱ्यांचे नुकसान

Farmer Relief : आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार मदत करा

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

SCROLL FOR NEXT