डॉ. अतुल पाटणेपोल्ट्री शेडमध्ये कायम हवा खेळती राहील या अनुषंगाने बाजूचे पडदे नेहमी खाली असावेत. शेडमध्ये अतिरिक्त पंखे बसवावेत.शेडच्या छताला बाहेरून पांढरा रंग किंवा चुना मारावा. उन्हाळ्यात कोंबडी खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण (१०० ते १५० कॅलरी) कमी करावे. त्याऐवजी १ ते २ टक्क्यांनी प्रथिनांचे प्रमाण वाढवावे..वाढत्या तापमानाचा कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कोंबड्यांना घामग्रंथी नसतात ते श्वासोश्वासाद्वारे आपल्या शरीराचे तापमान संतुलित ठेवत असतात. साधारणतः कोंबड्या २२ ते २८ अंश सेल्सिअस तापमानात चांगल्या प्रकारे उत्पादन देत असतात, कारण हे तापमान त्यांच्यासाठी आरामदायी असते. या तापमानाच्यावर शेडमधील तापमान जाईल तसतसे कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत असतो..Poultry Farming: मुसळवाडीत कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद.कोंबड्या तोंडाद्वारे जलद श्वास घेतात किंवा धापा टाकतात. ३३-३४ अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यास वाढीवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा उष्माघातामुळे मरतुकदेखील दिसून येत असते. उन्हाळ्यात तापमानापासून बचाव करण्यासाठी कोंबड्यांचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी उन्हाळ्यामध्ये व्यवस्थापनात बदल आवश्यक आहेत..शेडमधील व्यवस्थापनशेडचे बांधकाम हे नेहमी उंचीवर केलेले असावे, त्यामुळे शेडमधील वायुविजन व्यवस्थित राहते.शेडची दिशा ही नेहमी पूर्व पश्चिम असावी.शेडच्या छताची कडा (पन्हाळी) ३ ते ४ फूट बाहेर असावी, त्याने सूर्यप्रकाश किंवा पावसाचे पाणी आत येत नाही.उन्हाळ्यामध्ये इतर ऋतूंच्या प्रमाणात शेडमधील कोंबड्यांची घनता १० टक्क्यांनी कमी असावी..Poultry Farming: कोंबड्यांसाठी ‘स्टिंबायोटिक’ पूरक खाद्याची निर्मिती.शेडमध्ये कायम हवा खेळती राहील या अनुषंगाने बाजूचे पडदे नेहमी खाली असावेत. शेडमध्ये अतिरिक्त पंखे बसवावेत.शेडच्या छताला बाहेरून पांढरा रंग किंवा चुना मारावा.शेडच्या पत्र्यावर भाताचा पेंढा किंवा उसाचे पाचट टाकावे. ते ओले करण्यासाठी स्प्रिंकलर बसवावेत किंवा इतर साधनांचा वापर करावा.बाजूच्या जाळीवर बारदान लावावे, दुपारच्या वेळेत ओले करावेत.शेडमध्ये फॉगर्स बसवावेत. दुपारच्या वेळेत ठरावीक वेळेमध्ये चालू बंद करावेत.शेडच्या जमिनीवर कायम १ ते १.५ इंच जाडीचा तुसाचा थर राहील याची काळजी घ्यावी. कोंबड्यांना दिवसा (१२ ते ४ वेळेत) शेडच्या बाहेर अजिबात सोडू नये..पाणी व्यवस्थापनउन्हाळ्यात कोंबड्यांसाठी २४ तास पिण्याचे पाणी मुबलक, स्वच्छ व थंड उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी.उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत थंड पाणी उपलब्ध करावे. त्यासाठी पाण्याची टाकी शक्यतो शेडमध्ये बसवावी किंवा बाहेर असेल तर टाकीला सावली करावी, बारदाना गुंडाळून पाणी मारावे.पिण्याच्या पाण्यामध्ये सॅनिटायझरचा वापर करावा.उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे भांडी वाढवावीत, खाद्याच्या भांड्याच्या तिप्पट पाण्याची भांडी असावीत..Poultry Farming: वाढत्या उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन.खाद्य व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये दीड ते दोन महिने वरील वयाच्या कोंबड्यांना दिवसा उन्हाच्यावेळी खाद्य देऊ नये, त्यांना शक्यतो पहाटे, सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री देखील खाद्य देऊ शकतो.उन्हाच्या वेळी खाद्य खाल्ल्याने शरीरात अजून ऊर्जा तयार होऊन शरीरावर ताण येत असतो, त्यामुळे बऱ्याचदा अशावेळी मरतुक देखील होण्याची शक्यता असते.उन्हाळ्यात खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण (१०० ते १५० कॅलरी) कमी करावे. त्या ऐवजी १ ते २ टक्क्यांनी प्रथिनांचे प्रमाण वाढवावे.मोठ्या कोंबड्यांच्या खाद्यात मेथी घास किंवा हिरव्या पालेभाज्या वाढवाव्यात..आरोग्य व्यवस्थापनउन्हाळ्यात उष्माघातामुळे कोंबड्यांची मरतुक होत असते. कोंबड्या तोंडाद्वारे जलद श्वासोच्छ्वास किंवा धापा टाकत असतात, त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉलाइटचे प्रमाण कमी होऊन शरीरावर ताण येत असतो. अशावेळी पिण्याच्या पाण्यातून दररोज इलेक्ट्रॉलाइट, जीवनसत्त्व क पावडर तसेच ग्लुकोज पावडर द्यावी.तापमानाचा ताण कमी करणे व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मल्टिव्हिटॅमिनयुक्त औषधे द्यावीत..लहान पिलांना ताकद येण्यासाठी गुळाचे पाणी द्यावे.उन्हाळ्यात लसीकरण शक्यतो सकाळी लवकर किंवा रात्री करावे.दुपारच्या वेळी कोंबड्यांना हाताळू नये.अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी अतिरिक्त मिनरल पावडरचा वापर करावा.डॉ. अतुल पाटणे, ८३०८७८९९४८(सहायक आयुक्त- पशुसंवर्धन, अकोले, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.