Vegetable auction closed at Nandgaon Market Committee
Vegetable auction closed at Nandgaon Market Committee 
मुख्य बातम्या

नांदगाव बाजार समितीत भाजीपाला लिलाव बंद

टीम अॅग्रोवन

नांदगाव, जि. नाशिक : मालेगावला उद्भवलेल्या ‘कोरोना’च्या परिस्थितीचा परिणाम म्हणून शहरातील भाजीपाला विक्री अचानकपणे बंद करण्याचा निर्णय येथील पालिका प्रशासनाने जाहीर केला. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनेही सोमवार (ता.१३) भाजीपाला लिलावाचे व्यवहार बंद केले. याचा परिणाम तालुक्यातील भाजीपाला उत्पादकांवर झाला. त्यामुळे अनेकांना माघारी परतावे लागले. बाजार समितीत उपाययोजनांच्या नियोजनात सुसुत्रता नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. 

बाजाराला होणारी गर्दी व त्यातून ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्यात येणाऱ्या समस्येमुळे पालिकेने शहरातील भाजीपाला विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला, अशी कारणे सांगण्यात येत आहेत. बहुतांशी विक्रेते मालेगावहून भाजीपाला आणत असल्याचे कारण त्यामागे असल्याचे पालिकेकडून सांगितले जाते.

दरम्यान, भाजीपाला विक्रीला बंदी करताना दूधविक्रीही थांबविण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादकांकडील अर्थकारणावर परिणाम झाला आहे. शिल्लक दुधाचे करायचे काय? असा प्रश्‍न आहे. भाजीपाला विक्रेत्यांना यापूर्वी विभागून विक्रीसाठी वार ठरवून देण्यात आले होते. मात्र, बाजारातील गर्दी मात्र कमी होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

याबतीत बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांना विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यानी निर्णय घेतला. त्यामुळे बाजार समितीनेही भाजीपाला लिलावाचे व्यवहार थांबविले.’’ मात्र, अन्य व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होते. कांद्याचे आवक होऊन ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा येवला - नांदगाव - येवला रस्त्यावर लागलेल्या होत्या. मात्र येथे ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत लिलाव पार पडले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT