तज्ज्ञ पाहणी
तज्ज्ञ पाहणी  
मुख्य बातम्या

कडाक्याच्या थंडीने गव्हाच्या विविध वाणांची रोपे नष्ट

टीम अॅग्रोवन

सातारा ः येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठ संचलित गहू गेरवा संशोधन केंद्रात गहू संशोधनासाठी वाढविलेली सुमारे दोन हजार ७७९ वाणाची रोपे कडाक्याच्या थंडीने जळून नष्ट झाली. त्यामुळे गव्हावरील तांबेरा रोगावरील संशोधन, निरीक्षण व त्याच्या अनुमानासाठी सुमारे वर्षभर थांबावे लागणार आहे. गव्हावरील तांबेरा रोगावर संशोधन करण्यासाठी महाबळेश्वर येथील विविध गुणधर्मांच्या गव्हाचे प्रकार ( जर्मप्लास्म) वाढविले जातात. गव्हावरील तांबेरा रोगासंदर्भातील सर्व प्रकारचे संशोधन या केंद्रामधून केले जाते. देशातील एकमेव गहू गेरवा संशोधन केंद्र असून, या केंद्रातून चाचणी झालेले तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असलेली वाण देशातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी शिफारस केले जातात. विविध प्रकारचे गव्हाचे प्रकार  या केंद्रातील शेतात घेतले जातात. ते वाढवून त्याचे निरीक्षण केले जाते.  वेगवेगळ्या हंगामात त्यावर येथील वातावरणाचा काय परिणाम होतो, याचे निरीक्षण करून त्याची रोजच्या रोज नोंद केली जाते. येथील थंड हवा गव्हावरील तांबेरा रोगासाठी अतिशय पोषक असल्याने लागवड केलेल्या विविध प्रकारच्या गव्हाच्या जातींवर याचा काय, कसा व किती प्रमाणात परिणाम होतो, याचे अचूक निरीक्षण, त्यावर संशोधन या केंद्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून केले जाते. या वर्षी ही अशाच  2779 प्रकार संशोधन केंद्राने लावले होते. गेल्या आठ महिन्यांपासून त्याचे संगोपन करून ते उत्तम प्रकारे वाढविले होेते.  सध्या या संपूर्ण क्षेत्रात गव्हाची रोपे पूर्णपणे वाढली होती. तसेच सध्याच्या रब्बी हंगामातील येथील थंडीमुळे गव्हावरील तांबेरा रोगास वातावरण अनुकूल होते व त्याच्या निरीक्षणाची तयारी शास्त्रज्ञांनी केली असतानाच आठ व नऊ फेब्रुवारी रोजी अचानक या भागातील थंडी वाढली.  थंडीचा कडाका एवढा वाढला, की त्याने या वर्षीच्या हंगामातील नीचांकी थंडीचा उच्चांक केला. वेण्णा तलाव ते लिंगमळा परिसरातील नीचांकी तापमान ० ते उणे दोनपर्यंत खाली गेले होते. गहू गेरवा केंद्रात तर त्यांच्या तापमापकाने उणे चारपर्यंतची नोंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे परिसरातील फळे, पालेभाज्या, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची रोपे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. गेले सात-आठ महिने मोठ्या मेहनतीने वाढविलेल्या विविध जातीच्या गव्हावरील तांबेरा रोगाच्या संशोधनासाठी आता पुढील वर्षापर्यंत थांबण्याची वेळ आल्याने या गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ, निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची मेहनत वाया गेली आहे.  आता तांबेरा रोगावरील संशोधन, निरीक्षण व त्याचे अनुमान पुन्हा पावसाळ्यानंतर त्याची लागवड करून ती वाढल्यानंतर करावे लागणार आहे. त्यासाठी सुमारे वर्षभर तरी थांबावे लागणार आहे. शास्त्रज्ञाकडून पाहणी थंडीच्या कडाक्याने नष्ट झालेल्या गव्हाची पाहणी अखिल भारतीय समान्वित आणि बार्ली सुधार कर्नाल येथील पाच सदस्यीय शास्त्रज्ञांच्या चमूने बुधवारी (ता. २०) शास्त्रज्ञ टी. के. नरुटे याच्या समवेत पाहणी केली आहे. या चमूत डाॅ. चरण सिंग, डाॅ. आर. पी. मीना, धारवाड कृषी विद्यापीठाचे डाॅ. रूद्रा नाईक, निफाड संशोधन केंद्राचे डाॅ. एस. एम दोडके, डाॅ. बी. गमे यांच्या समावेश आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT