‘लाळ खुरकूत’ची ७० हजार जनावरांना लस Vaccination of 70,000 animals against saliva scabies 
मुख्य बातम्या

वाळवा तालुक्‍यात ‘लाळ खुरकूत’ची ७० हजार जनावरांना लस

संभाव्य लाळ खुरकूत आजाराच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन राज्य शासन व जिल्हा परिषदेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम राबवली आहे. वाळवा तालुक्‍यातील सुमारे ७० हजार जनावरांनालसीकरण देण्याचे काम पूर्ण केले आहे.

टीम अॅग्रोवन

इस्लामपूर, जि. सांगली  : संभाव्य लाळ खुरकूत आजाराच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन राज्य शासन व जिल्हा परिषदेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम राबवली आहे. वाळवा तालुक्‍यातील सुमारे ७० हजार जनावरांना लाळ खुरकूत या साथीच्या आजाराचे लसीकरण देण्याचे काम पूर्ण केले आहे. पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. नितीन कदम यांनी ही माहिती दिली. लाळ खुरकूत हा आजार संसर्गजन्य आहे. दोन खूर असणाऱ्या गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या-मेंढ्या, जनावरांमध्ये या रोगाची लागण होते. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये थंडीच्या वातावरणात या आजाराची जनावरांना लागण होण्याची जास्त शक्‍यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जनावरांना लसीकरण करून घेणे गरजेचे असते. शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्‍यातील विविध ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. या बाबत माहिती देताना अधिकारी नितीन कदम म्हणाले, ‘‘लाळ खुरकूत या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. सुरवातीस जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. तोंडात छोटे-मोठे व्रण, फोड येतात. ते फुटून तोंडात जखमा होतात. जनावरांना वैरण खाता येत नाही. पायांना जखमा होतात. गाभण जनावरांना गर्भपाताचा धोका वाढतो. दुधाळ जनावरांमध्ये दूध उत्पादनात घट होते. आजारी जनावरांचा शिल्लक राहिलेला चारा, पाणी निरोगी जनावरांच्या खाण्यात आला, किंवा तोंडातून पडणाऱ्या लाळीच्या माध्यमातून लाळ खुरकूत विषाणूचा प्रसार होतो. यासाठी आजारी जनावर गोठ्यात वेगळे बांधावे. त्याचे तोंड पोटॅशियमच्या पाण्याने स्वच्छ धुणे, ग्लिसरीन लावणे, पायांची जखम धुऊन त्याला मलम लावणे, पशवैद्यकाकडून औषधोपचार करून घेणे या बाबी शेतकऱ्यांनी कराव्यात. अडगळ वस्ती, गावात काही कारणामुळे जनावरांना लसीकरण केले नसेल तर त्वरित नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे. दृष्टिक्षेपात लसीकरण मोहीम

  •  लसीकरण करावयाच्या जनावरांची संख्या- ९७ हजार
  •  लसीकरण झालेली जनावरे-७० हजार
  •  लसीकरण न केलेली जनावरे- २७ हजार
  •  अंतिम तारीख- ३० नोव्हेंबर २०२०
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

    Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

    Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

    Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

    UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

    SCROLL FOR NEXT