युरिया
युरिया 
मुख्य बातम्या

नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने सरळ खतांची मागणी वाढली आहे. परंतु युरिया पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शिवाय अनेक खत विक्रेते ई-पॉसचा वापर करीत नाहीत. तसेच जादा दरात युरियाची विक्री करीत असल्याचे प्रकार सुरू आहेत. गरज असते त्या वेळी नेमका युरिया उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.  जिल्ह्यात सुमारे १००० खत विक्रेते आहेत. यातील सर्वांनाच ई-पॉस मशिनचे वितरण केले आहे. या मशिनमध्ये खते विक्रीची नोंद करून विक्री बंधनकारक आहे. याच मशिनमधून आलेले बिलही शेतकऱ्यांना द्यायच्या सूचना आहेत. परंतु जळगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, रावेर, यावल भागात अनेक खत विक्रेते फक्त प्रयोग म्हणून या मशिनचा वापर करतात. पाच-दहा व्यवहार या मशिनचा वापर करून करतात. परंतु एरवी सर्रास खतांची विक्री करून पुस्तकातील पावत्यांच्या स्वरूपातील बिल शेतकऱ्यांना दिले जात आहे. युरियावर जामनेर, चाळीसगाव, अमळनेर भागात लिंकिंग सुरू आहे. १० गोण्यांवर एक ३०० ते ४०० रुपयांचे विद्राव्य खत किंवा इतर अन्नद्रव्ये शेतकऱ्यांच्या माथी मारतात.  वाहतूक भाडेही वसूल युरिया वाहतुकीसाठी काही ठिकाणी पाच रुपये, काही ठिकाणी दहा तर रावेर, चाळीसगाव, अमळनेरसाठी १५ रुपयांपर्यंत खर्च येतो. या भागात हे वाहतूक भाडे शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहे. बिलावर मात्र त्याची नोंद नसते. जिल्ह्यात काही कंपन्यांनी खतपुरवठा केला आहे. परंतु ग्रामीण भागापर्यंत अजून पुरेसा युरिया पोचला नाही. युरियाचा ५० टक्केच पुरवठा झाल्याची माहिती आहे, तर संयुक्त खतांचा मिळून ६४ टक्‍क्‍यांपर्यंत पुरवठा झाला आहे. सुपर फॉस्फेट, पोटॅशचा पुरवठा ५० टक्‍क्‍यांवर झाला आहे, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT