Under ‘Prime Irrigation’ 22 crore plan 
मुख्य बातम्या

वर्धा जिल्ह्यात ‘पंतप्रधान सिंचन’अंतर्गत २२ कोटींचा आराखडा

वर्धा : पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली जात आहेत. सन २०२२-२३ या वर्षासाठी योजनेंतर्गत २२ कोटी ४१ लक्ष रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. ५ हजार ३०० हेक्टरवर जलसंधारणाची कामे प्रस्तावित आहेत.

टीम अॅग्रोवन

वर्धा : पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली जात आहेत. सन २०२२-२३ या वर्षासाठी योजनेंतर्गत २२ कोटी ४१ लक्ष रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. ५ हजार ३०० हेक्टरवर जलसंधारणाची कामे प्रस्तावित आहेत. 

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत या आराखड्यास मान्यता देण्यात आली. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

कृषी सिंचन योजनेंतर्गत जलसंधारणाची वेगवेगळी कामे हाती घेतली जातात. त्यात निवडलेल्या गावांमध्ये योजने अंतर्गत ढाळीचे बांध, सिमेंटनाला बांध, खोल सलग समतल चर आदी जलसंधारणाची कामे केली जातात. या कामांसोबतच प्रकल्पामध्ये समाविष्ट गावांतील भूमिहीन नागरिक, बचतगट, वैयक्तिक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या व्यवसायासाठी फिरता निधी दिला जातो.सन २०२२-२३ या वर्षासाठी कृषी विभागाने तयार केलेला वार्षिक कृती आराखडा २२ कोटी ४१ लक्ष रुपयांचा आहे.

त्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ५ हजार ३०० हेक्टर इतके क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणले जाईल, असे देशभ्रतार यांनी सांगितले.

चार प्रकल्पांना मंजुरी

पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यात २६ कोटी ३४ लक्ष किमतीच्या चार प्रकल्पांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमधील एकूण ४३ गावांमध्ये तब्बल १३ हजार हेक्टरवर जलसंधारणाची कामे केली जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kidney Sale Case: किडनी विक्री प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

Greenfield Highway: नाशिक-सोलापूरदरम्यान ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’

Manmad APMC: मनमाड बाजार समितीमध्ये आता ऑनलाइन कामकाज

Agriculture Commissioner Promotion: कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना सचिवपदी पदोन्नती

Rice Variety: ‘ट्रॉम्बे कोकण महान’ भाताची जात प्रसारित

SCROLL FOR NEXT