महात्मा फुले विद्यापीठांतर्गत  कृषी पदवी, पदकांत मुलींची बाजी  Under Mahatma Phule University Agriculture degree, girls bet on medals 
मुख्य बातम्या

महात्मा फुले विद्यापीठांतर्गत  कृषी पदवी, पदकांत मुलींची बाजी 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ नुकताच झाला. कृषी पदवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत बीएस्सी, एमएसस्सी, व पीएचडी मिळून ६८ पदव्या देण्यात आल्या.

टीम अॅग्रोवन

नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ नुकताच झाला. कृषी पदवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत बीएस्सी, एमएसस्सी, व पीएचडी मिळून ६८ पदव्या देण्यात आल्या. यात तब्बल ५० पदके मिळवून मुलींनी बाजी मारली. बीएसस्सीच्या प्रथम पदकात हर्षदा देसले (धुळे) व प्रेरणा खोत (बारामती) या अव्वल ठरल्या आहेत.  महात्मा फुले कृषी विद्यापीठात नुकताच पदवीदान समारंभ झाला. त्यात विद्यापीठ अंतर्गतच्या २०२० व २०२१ या दोन वर्षांतील १०४ विद्यार्थ्यांना पीएचडी, ६२८ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, १०,७३६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या शिवाय दोन्ही वर्षांत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या बीएस्सीच्या २४, एमएस्सीच्या ३४ व पीएचडीच्या १० विद्यार्थ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री दादा भुसे, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते विविध पदके देऊन गौरव करण्यात आले. यात मुलींनीच बाजी मारली. ६८ पदकांपैकी ५० पदकांनी मुलींचा गौरव झाला. बीएसस्सीसाठी लक्ष्मीनारायण बिहिरीलाल बिहाणी सुवर्णपदक, वसंतदादा पाटील सुवर्णपदक, अन्य एक पदक व दहा हजार रुपये रोख रकमेचा मान २०२०साठी हर्षदा देसले व २०२१साठी प्रेरणा रमेश खोत मानकरी ठरल्या आहेत. 

विविध पदकांचे मानकरी  बीएस्सी ॲग्री ः २०२० ः हर्षदा देसले (धुळे), गौरी रोकडे (बारामती), शुभम करपे (पुणे), सोनाली माने, चेतन शिंदे (मालदाड), प्रतीक्षा निघुते (पुणे), मृणाल मारणे, (सर्व २०२०) -ः प्रेरणा खोत (बारामती), प्रज्ञा कोकाटे (नाशिक), श्‍यामल भगत (पुणे), स्नेहल कदम (पुणे), ऋषिकेश भवर, ज्ञानेश्‍वर शिंदे (नाशिक), आदित्य जोशी (२०२१) -ः प्रेरणा खोत (बारामती), प्रज्ञा कोकाटे (नाशिक), श्‍यामल भगत (पुणे), स्नेहल कदम (पुणे), ऋषिकेश भवर, ज्ञानेश्‍वर शिंदे, आदित्‍य जोशी. 

एमएसस्सी ॲग्री ः (२०२०) -ः प्रियंका जगताप (राहुरी), श्‍वेता देवकर (धुळे), सी. जे. विकास, कृष्णप्रिया एम. के. (पुणे), अजय खैरनार, प्रमिला उदागत्ती, अभिजित शिंदे, आश्‍विनी कोरे, प्रियंका पाटील, आरती बोरस्ते, के. ग्रिस्मा, बालुंदगी पवित्रा, पूजा लिंबोरे, पौर्णिमा गाडे, जान्हवी जोशी. (२०२०) ः पूनम गुंजाळ, सायली शिंदे, सिरीन पंडित, ऋतुजा मानुगडे, ज्ञानेश्‍वर देसाई, शुभांगीनी वाळुंज, चेतन चौगुले, मुग्धा मवालकर, मीरादेवी तामीदेला, सुशांत जाधव, प्रियंका गुंड, निखीताताई येलमुले, आदित्य सुर्वे, ज्ञानेश्‍वरी चासकर, विद्या खांडेकर. 

पीएचडी (ॲग्री) ः (२०२०) ः लक्ष्मण सुमनर, श्रीकांत खुपसे, सोमेश्‍वर राऊत, रितेश पाटील, रविराज पवार.  (२०२१) ः पल्लवी बनसोड, सुचिता भोसले, युवराज व्यवहारे, पल्लवी तांबे.  प्रतिक्रिया 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत यश मिळवत पदके मिळवण्यात मुली आघाडीवर असल्याचे पाहून आनंद झाला. शेती विकासात महिलांचा मोठा वाटा आहे. कृषी पदवीत यश मिळवेल्या या मुली आता शेतकऱ्यांसाठी काम करतील.  दादा भुसे, कृषिमंत्री 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT